CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 06:01 PM2021-04-06T18:01:18+5:302021-04-06T18:05:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

CoronaVirus Live Updates top 10 districts having most of active COVID cases, 7 districts are from Maharashtra | CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर

googlenewsNext

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,26,86,049 वर पोहोचली आहे. याच दरम्यान चिंताजनक बाब समोर आली आहे, 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे.  "देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगड आणि दिल्लीतील एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे" अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे. 

"पंजाब आणि छत्तीसगढमध्ये वाढती मृत्यूसंख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचं प्रमाण 34 टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त 60 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या 70 टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचं राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे" असं देखील भूषण यांनी सांगितलं आहे. 

टेन्शन वाढलं! मोदी सरकार कोरोनाविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये; केंद्राच्या 50 टीम महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाबला रवाना

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाउल उचललं आहे. केंद्राने उच्च स्तरीय 50 वैद्यकीय टीम तयार केल्या आहेत. कोरोनाचां संसर्ग वेगाने होत असलेल्या भागांमध्ये या टीम पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने 50 टीम तयार केल्या आहेत. या अतिशय उच्च स्तरीय टीम आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी टीम राज्यांना सहकार्य आणि मदत करतील. यामध्ये 30 टीम महाराष्ट्र, 11 टीम छत्तीसगड आणि 9 टीम या पंजाबमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

Web Title: CoronaVirus Live Updates top 10 districts having most of active COVID cases, 7 districts are from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.