CoronaVirus Live Updates : भीषण वास्तव! ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने बाईकवरून घरी आणला लेकीचा मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:18 PM2021-04-27T15:18:30+5:302021-04-27T15:24:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या वडिलांना तिला बाईकवरून सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नेले. 

CoronaVirus Live Updates oxygen crisis death 19 year old girl government tramuma centre firozabad uttar pradesh | CoronaVirus Live Updates : भीषण वास्तव! ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने बाईकवरून घरी आणला लेकीचा मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus Live Updates : भीषण वास्तव! ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने बाईकवरून घरी आणला लेकीचा मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. शेवटी हतबल झालेल्या बापाने बाईकवरून लेकीचा मृतदेह घरी आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमधील एका मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या वडिलांना तिला बाईकवरून सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नेले. 

सरकारी ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. वेळेत योग्य उपचार आणि ऑक्सिजन न मिळाल्याने मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मात्र त्यानंतर तिला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील मिळाली नाही. शिवनारायण यांच्या मुलीची प्रकृती ही अचानक बिघडली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी त्यांनी अनेकदा फोन केला. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. 

मुलीची प्रकृती आणखी बिघडत असल्याने वडिलांनी तिला बाईकवरून नेले आणि तातडीने रुग्णालय गाठले. मात्र तिथे ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने वडिलांच्या डोळ्यादेखतचं मुलीचा जीव गेला आहे. वडिलांनी आपला मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते मुलीला वाचवू शकले नाहीत. नियमांनुसार, मृतदेह हा वाहनातून घरी पाठवण्यात येतो. मात्र अशी कोणतीच सोय ही सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नव्हती. शेवटी हतबल झालेल्या बापाला आपल्या लेकीचा मृतदेह हा बाईकवरूनच आणावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयावह! मृत्यूनंतर तब्बल 21 तास घरातच पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; मग झालं असं काही...

मृत्यूनंतरही अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे हाल होत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर तब्बल 21 तास कोरोनाग्रस्ताचा मृतदेह घरातच पडून असल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये घटना घडली आहे. 58 वर्षीय किशनलाल सोनी यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जवळपास 21 तास त्यांचा मृतदेह हा घरातच पडून होता. किशनलाल यांना एक मुलगा आहे मात्र त्यांची मानसिक प्रकृती ठीक नाही. कोरोनमुळे किशनलाल यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी गावातील कोणीच तयार झालं नाही. काही लोकांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. मात्र प्रशासनाच्या वतीने देखील कोणीच पुढे आले नाही. शेवटी शेजारच्याच काही लोकांनी यासाठी पुढाकार घेतला.



Web Title: CoronaVirus Live Updates oxygen crisis death 19 year old girl government tramuma centre firozabad uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.