शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus Live Updates : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाचे 24 तासांत 3,37,704 नवे रुग्ण; ओमायक्रॉन केसेस 10,050 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 10:14 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 488 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (22 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,37,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,88,884 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी  21,13,365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 

देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10,050 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. तर कोरोनाचा वेग वाढला असून देशातील पाच राज्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे  48,270 रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर कर्नाटकात 48,049 रुग्ण, केरळमध्ये 41,668, तामिळनाडूमध्ये 29,870, गुजरातमध्ये 21,225 रुग्ण सापडले आहेत. 

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्येही काही लक्षणं दिसून येत आहेत. जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणंही सौम्य आहेत. कोविडचे वेळोवेळी येणारे नवीन प्रकार पाहता, कोरोना लक्षणांच्या प्रोफाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस