हृदयद्रावक! दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्या वडिलांनीही कोरोनामुळे सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:24 PM2021-05-23T19:24:05+5:302021-05-23T19:26:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 

CoronaVirus Live Updates father died after two sons died of coronavirus infection in greater noida | हृदयद्रावक! दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्या वडिलांनीही कोरोनामुळे सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना

हृदयद्रावक! दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्या वडिलांनीही कोरोनामुळे सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,65,30,132 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 

एका पित्याने काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे आपला दोन्ही मुलाला गमावलं होतं. एका मुलाचे अंत्यसंस्कार होत नाहीत. तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. नोएडाच्या जलालपूर गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. यानंतर आता पित्याचा ही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोरोना उपचारादरम्यान अतार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अताप सिंह यांच्या कुटुंबात एकच मुलगा शिल्लक आहे. अतार सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे आपल्या डोळ्यांसमोर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. 

अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच निधन झालं. त्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसोबत त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतार सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झाल्याचं समजलं. दोन मुलांच्या मृत्यूनंतर अतार सिंह यांना मोठा धक्का बसला होता. मुलाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र रात्री तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. गावात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे. 

पहिल्या मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरतो ना सावरतो तोच दुसऱ्या मुलाचंही निधन झाले आणि आता अतार सिंह यांच्या निधनाने कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात आत्तापर्यंत अनेकांचा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 महिला आहेत. या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या सर्वांना आधी ताप आला आणि नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव

कोरोना काळात लग्न सोहळ्याचं आयोजन करणं थेट जीवावर बेतल्याची मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नाच्या 23 दिवसांनंतर नवरदेवाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील अजय शर्मा या 25 वर्षीय तरुणाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह झाला. कोरोना नियमांचे पालन करत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला होता. मात्र लग्नानंतर चार-पाच दिवसानंतर अजयची तब्येत बिघडली आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

Web Title: CoronaVirus Live Updates father died after two sons died of coronavirus infection in greater noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.