CoronaVirus Live Updates corona panic balaghat district three deaths in four days in the same house | CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने पत्नीनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रा

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने पत्नीनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रा

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीच्यावर गेला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

कोरोनाच्या संकटात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला. त्यामुळे चार दिवसांत एकाच घरातून तीन अंत्ययात्रा निघाल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील  सिकंदरा गावामध्ये एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी 31 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

60 वर्षीय वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर त्याच्या आईची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. मुलापाठोपाठ आपल्या पतीचा देखील मृत्यू झाल्याचं समजताच महिलेला खूप मोठा धक्का बसला. तिने रुग्णालयातच आपला जीव सोडला. तसेच या कुटुंबातील एका दहा वर्षांची मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने सर्वच रेकॉर्ड मोडले! गेल्या 24 तासांत 2 लाख रुग्ण सापडले; चिंता वाढवणारी आकडेवा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (15 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,00,739 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,038 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,40,74,564  पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 73 हजारांवर पोहोचला आहे. देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. 

कोरोनाचे रौद्ररुप! 'या' शहरात दर 2 मिनिटाला एक व्यक्ती येतेय पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत भर

कोरोनाच्या संकटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानाच्या जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की, दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सीएमएचओच्या रिपोर्टनुसार, शहरात 770 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चार कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. जोधपूर आयआयटीमध्ये 74 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोना विस्फोट झाला आहे.

English summary :
CoronaVirus Live Updates corona panic balaghat district three deaths in four days in the same house

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Live Updates corona panic balaghat district three deaths in four days in the same house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.