शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! धार्मिक कार्यक्रम ठरला कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर'; 20 जण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 07:57 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : एक धार्मिक कार्यक्रम हा कोरोनाचा "सुपर स्प्रेडर" ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांच्यावर पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. चेन्नईमध्ये एक धार्मिक कार्यक्रम हा कोरोनाचा "सुपर स्प्रेडर" ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चेन्नईतील एका मंदिर उत्सवात भाग घेतलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात जवळपास 300 लोक सहभागी झाले होते. यापैकी 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू  झाला. 

कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (GSS) ने देखील पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे नमुने 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते आणि काही दिवसात पुन्हा नमुने घेतील. अहवालांनुसार संक्रमित लोकांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्याच्यावर ईएसआय, केएमसी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

2.29 लाख रुपये दंड वसूल

कोणताही सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी, मंदिरालगतच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मोठा मेळावा टाळण्यासाठी सरकारने शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सार्वजनिक प्रार्थनास्थळांवर सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली होती. कोरोनाची वेगाने प्रसार होऊन रुग्णसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या चेन्नई येथील कार्यक्रमाच्या आयोजकांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. 2,812 विवाह हॉल, 60 हॉटेल्स सरकारने ठरवलेल्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळले आहेत, ज्यातून 2.29 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मे 2021 पासून 3.70 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांनी लस घेतलेली नाही. ज्यांनी अद्याप लसीकरण केले नाही त्यांना लसीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आता या भागात शिबीर उभारले आहेत. तसेच चेन्नईच्या इरोड, कोईम्बतूर इत्यादी भागात गेल्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 11 ऑगस्ट रोजी चेन्नईमध्ये 243 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे शहरातील एकूण प्रकरणांची संख्या 540,300 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतChennaiचेन्नईTempleमंदिरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू