शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना झाल्याच्या संशयातून त्यानं केली आत्महत्या; कुटुंबीयांसाठी सुसाइड नोट लिहिल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 19:15 IST

गळफास घेण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती, ती आता सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्यानं मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.

उडुपीः कोरोना व्हायरसनं जगभरात खळबळ माजवली आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लागोपाठ वाढताना दिसत आहे. अनेक जण कोरोनाच्या भीतीपायी घरातच नजरकैद झाले आहेत. कर्नाटकातूनही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ५७ वर्षीय व्यक्तीनं कोरोनाच्या भीतीपायी आत्महत्या केली आहे. स्वतः गळफास घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय होता. गळफास घेण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती, ती आता सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्यानं मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.तसेच कुटुंबीयांनीसुद्धा आपली तपासणी करून घ्यावी. कर्नाटकातल्या उडुपीच्या व्यक्तीचा घराच्या बाहेर मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. ज्यांना घरातचं होम क्वारंटाइन करण्यास सांगितलं होतं, त्यातही या व्यक्तीचं नाव नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षण आढळून आलेली नव्हती. त्या व्यक्तीला पत्नी आणि दोन मुलं आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या संशयापायी आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. भारतातही कोरोना व्हायरसनं मृत्यू झालेल्यांची संख्या १५ झाली असून, जवळपास ६००हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्रातल्या नवी मुंबईतल्या वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा १२४वर पोहोचला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या