शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 9:19 AM

Coronavirus : वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह पोलीसही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला पोलीस कर्मचारी आपल्या अवघ्या 11  महिन्यांच्या बाळाला घेऊन काम करत आहे.

सासाराम - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 23,000 हून अधिक झाली आहे. तर 680 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह पोलीसही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला पोलीस कर्मचारी आपल्या अवघ्या 11  महिन्यांच्या बाळाला घेऊन काम करत आहे. पूजा कुमारी असं महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्या आपल्या बाळासह आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सासाराम येथील मुख्य चौकात ड्यूटी करणाऱ्या पूजा बिहारपोलिसात कार्यरत आहेत. त्यांना एक 11 महिन्यांचं गोंडस बाळ आहे. कोरोनाचं संकट देशावर असताना त्या दररोज ड्युटीवर येताना आपल्या अकरा महिन्यांच्या बाळालाही सोबत घेऊन येतात आणि आपलं कर्तव्य निभावतात.

पूजा बाळाला कडेवर घेऊन पोलीस आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी चोख रितीने बजावत आहेत. '11 महिन्यांच्या  बाळाला कडेवर घेऊन ड्यूटी करताना थोडा त्रास होतो, पण आईची माया बाळासाठी अशी अनेक संकट डोक्यावर घेऊ शकते' अशी प्रतिक्रिया पूजा यांनी दिली आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी देखील माहिती मिळताच पूजा कुमारीच्या निष्ठेचं कौतुक केलं आणि बाळाला घेऊन ड्यूटी करू नको असं सांगितलं. मात्र बाळाचा सांभाळ करायला घरात कोणी नसल्याने त्याला सोबत घेऊन ड्यूटी करावी लागत असल्याचं पूजा यांनी सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम

देशावर कोरोनाचं संकट असताना वीजेचं संकट ओढावू नये यासाठी वीज केंद्राचे कर्मचारी काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला कर्मचारी आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वीजपुरवठा कक्षात काम करत आहे. प्रगती तायडे असं महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या आपल्या चिमुकलीसह आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. भोपाळच्या कोलार सब-स्टेशनमध्ये टेस्टिंग ऑपरेटर म्हणून त्या काम करतात. वीज केंद्रात येताना त्या आपल्या सहा महिन्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन येतात आणि आपलं कर्तव्यही निभावतात.  'कठीण प्रसंगातही डॉक्टर, नर्स आणि पोलीस आपापलं कर्तव्य निभावत आहेत. अशा वेळी मी घरी कशी बसू शकते?, कोणाच्याही घरी अंधार पडू नये, यासाठी मला माझं कर्तव्य बजावणं आवश्यक आहे' असं प्रगती यांनी म्हटलं आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

CoronaVirus: पावसाळ्यात कोविड-१९ ची दुसरी लाट येणार?

CoronaVirus: कोरोना लस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारPoliceपोलिसIndiaभारतDeathमृत्यू