शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

coronavirus : भारत चीनमधून आयात करणार व्हेंटिलेटर्स आणि इतर सामुग्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:59 AM

देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढणारा संभाव्य आकडा विचारात घेऊन केंद्र सरकारने आपात्कालीन उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने सरकारसमोर गंभीर संकट भारत सरकार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स, N 95  मास्क आणि व्हेंटिलेटर्स चीनमधून मागावणार असल्याचे वृत्त मात्र चीनमधून टेस्टिंग किट्स मागवण्याबाबत भारताने भूमिका स्पष्ट केलेली नाही

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने सरकारसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढणारा संभाव्य आकडा विचारात घेऊन केंद्र सरकारने आपात्कालीन उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने देशातील खासगी उद्योजकांना आरोग्यविषयक साहित्यनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच वाढती गरज विचारात  घेऊन सरकारने पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स, N 95  मास्क आणि व्हेंटिलेटर्सची आयात करण्याचा विचार सुरू केला आहे. 

दरम्यान, भारत सरकार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स, N 95  मास्क आणि व्हेंटिलेटर्स चीनमधून मागावणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. मात्र चीनमधून टेस्टिंग किट्स मागवण्याबाबत भारताने भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्पेन, युक्रेन या देशांनी चीनमधून मागवलेल्या  टेस्टिंग किट्स सदोष असल्याचा दावा केला होता. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत सांगितले की, भारतीय रेडक्रॉस सोसायटीने चीनमधून 10 हजार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स मागवले होते. यांची डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, दान स्वरूपात मिळणारे 3  लाख PPE 4 एप्रिलपर्यंत मिळतील. तर 3 लाख PPE बनवण्याची ऑर्डर ऑर्डीनन्स कारखान्यांना दिली आहे. चीनमधील अलिबाबा फाऊंडेशन आणि अलिबाबा फाऊंडेशन यांच्याकडून दान करण्यात आलेली वैद्यकीय सामुग्री 28 मार्चरोजी भारतीय रेड क्रॉस सोसायटीला मिळाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, सरकारने सिंगापूरमधील एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मची ओळख पाठवण्यात आली आहे. ही कंपनी 10 लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्सचा पुरवठा करू शकते. या कंपनीला परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ऑर्डर देण्यात आली आहे. तर नोएडामधील आगवा हेल्थकेअरला 10 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनHealthआरोग्य