शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

CoronaVirus : रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांच्या संख्येत घट, ३ लाख ६२ हजार नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:06 AM

या संसर्गाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या २,५८,३१७ आहे तर ३७,१०,५२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली : देशात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुुरुवारी १४ हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ९७ लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले.बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजार होती व ४२०५ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ३६२७२७ नवे कोरोना रुग्ण आढळले व ३५,२१८१ जण बरे झाले. कोरोना रुग्णांंची एकूण संख्या २,३७,०३,६६५ असून त्यातील १,९७,३४,८२३ जण बरे झाले. या संसर्गाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या २,५८,३१७ आहे तर ३७,१०,५२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये १५.६५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण ८३.२६ टक्के व मृत्यूदर १.०९ टक्के आहे.

जगात १ कोटी ७८ लाख रुग्णांवर उपचार सुरू -     जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १६ कोटी ११ लाखांहून अधिक असून त्यातील १३ कोटी ८९ लाख जण बरे झाले तर ३३ लाख ४५ हजार जणांचा बळी गेलाआहे. -     १ कोटी ७८ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यांची संख्या ३ कोटी ३५ लाख आहे. -     त्यातील २ कोटी ६६ लाख जण बरे झाले आहेत व ५ लाख ९७ हजार जण अमेरिकेत कोरोनाचे बळी ठरले.-     या देशात सध्या ६३ लाख ६८ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.-     ब्राझिलमध्ये १ कोटी ५३ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ४ लाख २८ हजार जण या संसर्गामुळे मरण पावले आहेत.

यूपीएसएसी पूर्वपरीक्षा आता १० ऑक्टोबरला -     देशात कोरोना संसर्गाचा वाढलेला फैलाव पाहून यूपीएससीची २७ जूनला होणारी परीक्षा आता १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. -     एम्ल्पॉईज प्रॉव्हिटंड फंड ऑर्गनायझेशनमधील एन्फोर्समेन्ट ऑफिसर या पदासाठी यंदा ९ मे रोजी होणारी परीक्षा, तसेच कंबाईन्ड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामसाठी ५ मेपासून सुरू होणारी नोंदणी प्रक्रियाही  पुढे ढकलली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन