शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:59 AM

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली आहे. तसेच, लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर शुक्रवारी (दि.१६) आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. (children may also be at covid-19 risk proper planning needed to protect them health ministry)

या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. याचबरोबर, अजूनही 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट नोंदवणाऱ्या देशातील जिल्ह्यांविषयी आरोग्य मंत्रालयाने सावधगिरी व्यक्त केली असून कोरोना व्हायरस अजून संपला नसल्याचे म्हटले आहे.

मास्कच्या वापरात लक्षणीय घटगेल्या काही दिवसांत मास्क वापरण्यात लक्षणीय घट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आल्यानंतर मास्कच्या वापरामध्ये लक्षणीय घट झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आपण मास्क वापरणे ही गोष्ट सामान्य प्रक्रियेत समाविष्ठ केली पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले.

लव अग्रवाल म्हणाले की, देशात दुसरी लाट अद्याप संपलेली नाही आणि लोकांनी कोरोना नियमांचे योग्य पालन करावे. तसेच, कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेची तयारी करण्यासाठी आरोग्यच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारांना केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसमवेत देशातील सहा राज्यांमधील कोरोना परिस्थितीवर बैठक घेतली. यावेळी, गेल्या काही दिवसांत वरील 6 राज्यांत जवळपास 80 टक्के नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारांना कृतीशील पावले उचलण्यास पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी सरकारकडून लसींची मोठी ऑर्डरभारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. केंद्र सरकार लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी रुपयांचे जवळपास 66 कोटी डोस खरेदी करणार आहे. यामुळे निश्चित देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल. तसेच, ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच देशाला लसींचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आत्तापर्यंत एकूण 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.

 

या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशाराभारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे. डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी काल संवाद साधला. यावेळी कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते म्हणाले.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य