Join us  

प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 2:10 PM

यंदा प्रिती झिंटा का झाली कान्समध्ये सहभागी? तब्बल १७ वर्षांनी लावली हजेरी

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा ऐश्वर्या राय, नॅन्सी त्यागी, जॅकलीन फर्नांडिस, कियारा अडवाणी या भारतीय सुंदरींनी लक्ष वेधून घेतलं. तर आता नुकतंच आदिती राव हैदरीनेही तिच्या कमाल लूकने कान्स गाजवलं. पण या सगळ्यांवर भारी पडली ती अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta). होय 49 वर्षीय प्रिती झिंटानेही यंदा कान्समध्ये हजेरी लावली. पांढऱ्या आऊटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

२२ मे रोजा प्रिती झिंटा फ्रेंच रिवेरासाठी रवाना झाली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचं यंदाचं तिचं तिसरं वर्ष आहे. याआधी तिने 2006 साली कान्समध्ये पदार्पण केलं होतं. नंतर 2007 मध्येही तिने हजेरी लावली. आता १७ वर्षानंतर प्रिती झिंटाने पुन्हा कान्स गाजवलं. तिच्या पहिल्याच लूकने सर्वांना घायाळ केलं. शिमरी पर्ल व्हाइट गाऊनमध्ये तिने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं. तिने घातलेले मोत्यांचे इयररिंग्स शोभून दिसत आहेत. त्यात सुंदर हेअरस्टाईलमध्येही तिचा लूक खुलून आला आहे.

प्रिती झिंटा यंदा कान्समध्ये का गेली?

प्रिती सध्या 'लाहोर 1947' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच कारणाने तिने कान्समध्ये हजेरी लावली. सिनेमॅटोग्राफर संतोष सिवनला ती Pierre Angenieux ExcelLens अवॉर्डने सम्मानित करणार आहे. अभिनेत्रीने संतोष सिवनसोबत याआधीही काम केलं आह. मणिरत्नम यांच्या 'दिल से' सिनेमात संतोषचीच सिनेमॅटोग्राफी होती. 

'दिल से' सिनेमावेळी मणिरत्नम यांनी प्रिती झिंटाला विनामेकअप शूट करण्यास सांगितलं होतं. तेव्हा संतोष सिवननेच तिला स्क्रीनवर सुंदर दाखवले. 

टॅग्स :प्रीती झिंटाकान्स फिल्म फेस्टिवलबॉलिवूडसोशल मीडियाफॅशन