शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 8:18 AM

CoronaVirus : भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला  (Delta Plus Variant) व्हेरिएंट ऑफ कंसर्न (चिंताजनक) म्हटले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोग्य सचिवांनी या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असे म्हटले होते, पण आता अंतिम प्रसिद्धी पत्रात व्हेरिएंट ऑफ कंसर्न असा उल्लेख करण्यात आला आहे. भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत. तसेच, डेल्टा प्लस व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. (CoronaVirus : health ministry consider delta plus variant as variant of concern)

केंद्र सरकारने राज्यांना याचा सामना करण्यासाठी पत्र लिहून इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्व माहिती जमा केली जात आहे. तसेच, डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन प्रभावी आहेत, असे आढळून आले आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट सध्या भारतसह जगातील 80 देशांमध्ये आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासह 9 देशांमध्ये आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन, रशियासह भारतात सापडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात डेल्टा प्लस प्रकारातील 22 प्रकरणांपैकी 16 प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. उर्वरित प्रकरणे केरळ आणि मध्य प्रदेशात आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या या व्हेरिएंटचे प्रकरण लहान वाटत आहे, परंतु ते मोठे होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट किती वेगाने पसरतो आणि किती धोकादायक आहे, त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारात ठेवले जाते. बर्‍याच देशांमध्ये बर्‍याच दिवसांपासून डेल्टा व्हेरियंट सापडला आहे, परंतु त्याचे नवीन व्हेरिएंट डेल्टा प्लस हे एक मोठे आव्हान बनत आहे, ज्यावर संशोधन चालू आहे.

तिसरी लाट अडवता येईलकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, बेजबाबदार वर्तन केल्यास ती येण्याची जास्त शक्यता आहे. लसीसोबत नियम व पथ्ये पाळली तर ती टाळता येईल. जर विषाणू जास्त संक्रमित होतोय किंवा त्याने स्वरूप बदलल्यासही धोका वाढू शकतो. परंतु, सध्या त्याबद्दल भाकित करता येणार नाही. ते म्हणाले, अनेक देशांत तिसरी, चौथी लाटही आली. परंतु, अनेक देशांत दुसरीही आली नाही.

राज्यांनी काय करावे?ज्या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत, तिथे प्रतिबंधात्मक उपाय करावेत. चाचण्या वाढवाव्यात. लसीकरणही वाढवावे आणि तेथील विषाणूचे नमुने चाचणीसाठी पाठवावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत