शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ, या राज्यात पुन्हा होणार कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:20 IST

अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतातील आसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहेगुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहीलआसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील

गुवाहाटी - सुमारे सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

पूर्वोत्तर भारतातीलआसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. तर आसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील, असे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितले.

लॉकडाऊनबाबत माहिती देताना हेमंत बिस्व शर्मा म्हणाले की, शुक्रवारपासून आसाममध्ये रात्रीच्या वेळी १२ तासांची संचारबंदी लागू करण्यात येईल. त्यानंतर शनिवारपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केले जाईल. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल. लॉकडाऊन दरम्यान काही परिसरांमध्ये लोकांच्या वर्दळीवर निर्बंध घालण्यात येतील. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहील. तसेच खासगी वाहनांनाही परवानगी दिली जाणार नाही.  सर्व मंदिरेसुद्धा बंद राहतील. तसेच केवळ अत्यावश्यक सेवानांचा परवानगी दिली जाईल.

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. आजही राज्यात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६ हजार ६४६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६०१ आहे.

दरम्यान, देशभरातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

मात्र या सर्वामध्ये दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssamआसामIndiaभारत