Coronavirus: दिलासादायक! "तिसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नाही जाणवणार, ऑक्टोबरपर्यंत ही राज्ये कोरोनामुक्त होणार’’, तज्ज्ञांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:46 AM2021-08-23T08:46:01+5:302021-08-23T08:48:06+5:30

Coronavirus News: कोरोनाच्या लाटामागून लाटा येत असल्याने सर्वसामान्य भीतीच्या छायेखाली वावरत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

Coronavirus: "The effects of the third wave of coronavirus will not be felt much, these states will be corona-free by October," experts claim | Coronavirus: दिलासादायक! "तिसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नाही जाणवणार, ऑक्टोबरपर्यंत ही राज्ये कोरोनामुक्त होणार’’, तज्ज्ञांचा दावा 

Coronavirus: दिलासादायक! "तिसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नाही जाणवणार, ऑक्टोबरपर्यंत ही राज्ये कोरोनामुक्त होणार’’, तज्ज्ञांचा दावा 

Next

कानपूर - गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या फैलावाने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या लाटामागून लाटा येत असल्याने सर्वसामान्य भीतीच्या छायेखाली वावरत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. (Coronavirus ) आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अगदीच नगण्य असल्याचा दावा केला आहे. ("The effects of the third wave of coronavirus will not be felt much, these states will be corona-free by October," experts claim)

मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा फैलाव अधिक होणार नाही, असे त्यांनी सांगितले. गणितीय मॉडेलच्या आधारावर त्यांनी हा दावा केला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग आता कमी होईल. तसेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि मध्य प्रदेशसारखी राज्ये कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

प्राध्यापक अग्रवाल यांना आपल्या संशोधनात दावा केला आहे की, ऑक्टोबर महिन्यापर्यंत देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही सुमारे १५ हजारांच्या आसपास राहील. त्याचे कारण तामिळनाडू, तेलंगाणा, केरळ, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तरेतील राज्यांमध्ये संसर्ग असेल. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता फार कमी आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अगदी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या साथीदरम्यान, सातत्याने आपल्या अभ्यासामधून सरकारला अलर्ट केले आहे. त्यांनी दुसऱ्या लाटेबाबत केलेला दावा बऱ्यापैकी अचूक ठरला होता. प्रा. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन आणि लसीकरणाचा खूप लाभ झाला आहे. दुसऱ्या लाटेनंतर लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. तसेच वेगाने सुरू असलेल्या लसीकरणामुळेही कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात मदत मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Coronavirus: "The effects of the third wave of coronavirus will not be felt much, these states will be corona-free by October," experts claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.