CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:38 AM2020-04-05T05:38:03+5:302020-04-05T05:38:45+5:30

कर्मचाऱ्यांना दिलासा; अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा निर्णय

CoronaVirus Don't worry about the future; No one lost there job hrb | CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

Next

बंगळुरू : कोरोनाची साथ व टाळेबंदी असेपर्यंत कोणालाही सेवेतून कमी करण्यात येणार नाही, असे आश्वासन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. भारतातही या कंपन्यांचे ठळक अस्तित्व आहे. त्यातील काही कंपन्यांनी ९० दिवस, तर काही कंपन्यांनी यंदाच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोणालाही नोकरीतून काढणार नाही. तसेच, नवीन भरतीचे प्रमाण कमी केले जाईल.


सॅप, मॉर्गन स्टॅनले, सेल्सफोर्स, पालो आॅल्टो नेटवर्क्स, पायपाल, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन, बँक आॅफ अमेरिका, बुझ अ‍ॅलेन हॅमिल्टन आदी कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. जेपी मॉर्गन इंडिया या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना साथीच्या काळात कोणालाही नोकरीवरून न काढण्याचा निर्णय आमच्या कंपनीने घेतला आहे. तसेच, काही जागांसाठी नवीन भरती केली जाणार नाही व काही ठिकाणी थोड्या प्रमाणात भरती केली जाईल. जेपी मॉर्गनचे भारतात ३४ हजार कर्मचारी आहेत. सॅप कंपनीने कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून ९० दिवसांपर्यंत कोणालाही नोकरीतून कमी न करण्याचे ठरविले आहे. या कंपनीचे भारतात १३ हजार कर्मचारी आहेत. मॉर्गन स्टॅनले या कंपनीचे सीईओ जेम्स गोर्मन यांनी म्हटले आहे की, यंदा आम्ही एकाही कर्मचाºयाला नोकरीतून कमी करणार नाही. या कंपनीचे भारतात ३,३०० कर्मचारी आहेत. सेल्सफोर्स कंपनीचे सीइओ मार्क बेनिआॅफ यांनी सांगितले, की कोरोनाची साथ पसरल्यापासून ९० दिवसांपर्यंत फारशी नोकरकपात करणार नाही. बुझ अ‍ॅलेन हॅमिल्टन कंपनीनेही १ जुलैपर्यंत कोणालाही नोकरीतून न काढण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)

पगार कापणार नाही : फ्लिपकार्ट
बंगळुरू : लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार बंद आहेत. अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होमद्वारे काम सुरू आहे. अशातच अनेकांचे रोजगार जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना फ्लिपकार्टने मात्र कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापणार नाही, तसेच कोणालाही कामावरून कमी केले जाणार नाही, असे म्हटले आहे. फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी काही मोजक्या स्टाफसोबत घेतलेल्या बैठकीत हे आश्वासन दिले आहे. तसेच फ्लिपकार्टमध्ये इंटर्नशिप करणाºया उमेदवारांचेदेखील काहीही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही फ्लिपकार्टने म्हटले आहे. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, कुणीही घाबरण्याचे कारण नाही. आमचे प्राधान्य कर्मचाºयांच्या आरोग्याला आहे. सर्वांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असेही या बैठकीत सांगण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. कोरोनामुळे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारीकपात किंवा पगारकपात करण्याबाबत बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे समजते. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. मात्र, या काळातदेखील आपले ग्राहक सांभाळून ठेवणे, हे आपले कौशल्य आहे. ग्राहकांसोबतची आपली नाळ तुटू न देता ज्यांना जसे शक्य आहे, त्याप्रमाणे कार्यरत राहावे. त्यासाठी आॅनलाइन किंवा आॅफलाइन पद्धतीने कंपनीसोबत आपण सगळे जोडलेले राहू शकता, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी मदत निधी‘पालो आॅल्टो नेटवर्क्स’चे सीईओ निकेश अरोरा यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात
आमच्या कंपनीतील एका कर्मचाºयाच्या नोकरीवर गदा येणार नाही. अमेरिका, तेल अविव, भारतामध्ये मिळून
या कंपनीचे सात हजार कर्मचारी आहेत. या कंपनीने कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी एक ा निधीची
स्थापना केली आहे. त्यासाठी व्यवस्थापन ४० लाख डॉलर देणार आहे.
४कोरोना साथीच्या काळात कमी काम व कमी नफा असूनही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना विशिष्ट मुदतीपर्यंत नोकरीतून कमी न करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची चर्चा आहे.

Web Title: CoronaVirus Don't worry about the future; No one lost there job hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.