शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:52 AM

केरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे.

नवी दिल्ली - देशभरातून एकत्रित केलेल्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेंसिंगमधून स्पष्ट होते, की कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट (B1617.2) कोरोना व्हायरस महामारीचे सर्वात मोठे कारण बनला आहे. सार्स-कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्शिअमने (INSACOG) म्हटले आहे, की लस कोरोना व्हायरसविरोधात अत्यंत चांगल्या प्रतिची सुरक्षितता प्रदान करते, असे जिनोम सिक्वेंसिंगच्या परिणामांवरून समोर आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, डेल्टा व्हेरिएंट व्हायरसच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पट संक्रमक आणि धोकादायक आहे. (CoronaVirus Delta variant is weakening by penetrating the vaccines protective shield but the danger remains)

देशात 87% संक्रण डेल्टा व्हेरिएंटमुळे - देशात मे-जून महिन्यात करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेंसिंगच्या परिणामांनुसार, 87% संक्रमण डेल्टा व्हेरिएंटमुळेच होत आहे. तसेच, अमेरिकेत 83% संक्रमणाचे कारण हाच व्हेरिएंट आहे. लस घेतल्यानंतर संक्रमित होणाऱ्या अधिकांश लोकांत डेल्टा व्हेरिएंटचाच परिणाम दिसून येतो मात्र, लस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. आणि संक्रमित झालेल्या फार कमी लोकांवर रुग्णालयात भरती होण्याची वेळ येते. लस घेतल्यानंतर संक्रमणामुळे मृत्यू होण्याचा आकडा तर आणखी कमी आहे. 

लसीमुळे कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट -आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, लस घेतल्यानंतर संक्रमित होणाऱ्या केवळ 9.8% लोकांनाच रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत आहे. तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 0.4% एवढे आहे. देशात जवळपास एक तृतियांश (33%) लोकसंख्येला अजूनही कोरोनाचा धोका आहेच, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) नुकत्याच केलेल्या सीरो सर्व्हेतून समोर आले आहे. 

कोरोना काही थांबेना!; निम्म्या जनतेचे लसीकरण तरीही विदेशात रुग्णसंख्या वाढतीच

कोविड प्रॉटोकॉल आणि लसीकरण अत्यंत आवश्यक -इन्साकॉगने सध्यस्थिती लक्षात घेत लसीकरण आणि कोविड प्रॉटोकॉल्सचे पालन करण्यावर अधिक जोर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'देशभरात डेल्टाचा हाहाकार सुरूच आहे. जनतेच्या एका वर्गाला अजूनही याचा धोका आहेच. संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आणि लोकांचे योग्य वर्तन अधिक आवश्यक आहे.'

काही राज्ये आणि जिल्हांची स्थिती चिंताजनक -केरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी, अधिकांश कोरोना रुग्ण समोर येणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे देशात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वाटते, अशी काही राज्ये आणि जिल्हे मार्क केली आहेत. देशात मंगळवारी 42,015 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस