Coronavirus: रॅपिड टेस्टिंग कीट्सच्या आयातीला ‘आयसीएमआर’कडून विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 01:43 AM2020-04-22T01:43:51+5:302020-04-22T06:52:12+5:30

मंत्री गट एक फेब्रुवारीला स्थापन; २४ मार्चपर्यंत निर्णयच झाला नाही; कीटस्ची मागणी वाढताच अधिकाऱ्यांची धावपळ

coronavirus Delay in import of Rapid Testing Kits from ICMR | Coronavirus: रॅपिड टेस्टिंग कीट्सच्या आयातीला ‘आयसीएमआर’कडून विलंब

Coronavirus: रॅपिड टेस्टिंग कीट्सच्या आयातीला ‘आयसीएमआर’कडून विलंब

Next

नवी दिल्ली : घातक ठरलेल्या कोरोना विषाणूबाबत (कोविड-१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांचा गट एक फेब्रुवारी रोजी स्थापन केला; परंतु भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग कीटस्ची आॅर्डर देण्याचा २४ मार्चपर्यंत काही निर्णयच घेतला नाही.

उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, चाचण्या आणि आयातीला परवानगी देण्यासाठी आयसीएमआर ही उच्चाधिकार असलेली नोडल यंत्रणा आहे. तिने रॅपिड अँटीबॉडी टेस्टींग किटसच्या खरेदीसाठी आॅर्डर दिली नाही. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसमुळे कोविड-१९ चा विषाणू अस्तित्वात आहे की नाही हे ३० मिनिटांत समजते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्ये आणि इतर आरोग्य संस्थांनी वारंवार विनंती करूनही आयसीएमआरने या किटसचे निष्कर्ष हे अंतिम नाहीत, असे सांगून आपली भूमिका सौम्य केली नाही. आयसीएमआरने आरटी-पीसीआर ही कोविड-१९ साठी फक्त दुजोरा देणारी चाचणी आहे, असाच आग्रह लावून धरलेला आहे. जेव्हा विषाणू देशभर पसरला व त्याच्या फैलावाचा वेग आयसीएमआर व तिच्या तज्ज्ञांनाही अपेक्षित नव्हता तेव्हा आयसीएमआरने धोक्याची घंटा वाजवली. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसच्या आयातीसाठीची पहिली निविदा २४ मार्च रोजी जारी करण्यात आली आणि २८ मार्च रोजी निविदा बंद झाल्या. अनेक निविदाधारकांना यात सामावून घेऊन आॅडर्स दिली गेली. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसची मागणी वाढताच भारतीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आयसीएमआरचे प्रवक्ते या किटस पाच एप्रिल रोजी येणार असल्याचे सांगतच होते. त्यानंतर ती तारीख ८, १२ आणि शेवटी १७ एप्रिल अशी सांगितली.

आणखी ४५ लाख कीटस्ची आॅर्डर
21 एप्रिल रोजी राज्यांकडे आयसीएमआरने चाचण्या करण्यासाठी कीटस् पाठवल्या. अशा पाच लाख किटस आल्यावर आयसीएमआरने आणखी ४५ लाख कीटस्साठी इतर देशांकडे १४ एप्रिल रोजी आॅडर्स दिली. रॅपिड टेस्टिंग कीटस् हे हॉटस्पॉटसमध्ये विषाणू शोधण्यासाठी आणि देखरेख ठेवण्याच्या उद्देशासाठी फारच उपयुक्त आहेत.

कोविड-१९ विरोधातील युद्धात सरकारी यंत्रणेने केलेली ही दुसरी मोठी चूक आहे.
पहिली चूक होती ती सरकारने लाखांच्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना तपासणी न करताच येऊ दिले आणि ‘होम क्वारंटाईन्ड’ प्रवाशांचा शोध न घेणे. धक्कादायक म्हणजे आता रॅपिड टेस्टिंग कीटस् सदोष आढळल्या असून दोन दिवस चाचण्या थांबवल्या आहेत.

Web Title: coronavirus Delay in import of Rapid Testing Kits from ICMR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.