शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 06:36 IST

उपचाराधीन रुग्ण १.३७ टक्के; शनिवारी शंभराहून कमी बळी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून, शनिवारी ही संख्या ११७१३ होती. या संसर्गातून १ कोटी ५ लाखांहून अधिक लोक बरे झाले असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आणखी कमी म्हणजे १.३७ टक्के झाले आहे. शनिवारी देशात बळींची संख्या अवघी ९५ एवढी होती.देशात कोरोना रुग्णांची संख्या १०८१४३०४ असून त्यापैकी १०५१०७९६ जण बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १४८५९० आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १५४९१८ जणांचा बळी गेला व मृत्यूदर १.४३ टक्के आहे. शनिवारी कोरोनाचे ११७१३ नवे रुग्ण सापडले तर १४४८८ जण बरे झाले. जगभरात १० कोटी ५९ लाख कोरोनारुग्ण असून त्यातील ७ कोटी ७५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेत २ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ७१ लाख रुग्ण बरे झाले.हवामान बदलामुळे कोरोना साथ?नवी दिल्ली : हवामान बदल आणि २००२-०३ सालातील सार्स साथीचा विषाणू यामुळे कोरोना विषाणूची साथ आली असावी, असा अंदाज एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. हरितग्रह वायूंमुळे वटवाघळांच्या प्रजातींनी स्थलांतरण केले असावे, त्यांनी आपल्यासोबत विषाणू नेले असावे, असे या अभ्यासात म्हटले आहे.‘द टोटल इन्व्हायरन्मेंट’ या विज्ञान नियतकालिकाच्या ताज्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांसह जगभरातील गणमान्य संशोधक या अभ्यासात सहभागी झाले आहेत. त्यात म्हटले आहे की, वातावरणीय बदलांमुळे दक्षिण चीनचा युन्नान प्रांत, म्यानमार आणि लाओस या भागात वटवाघळांची संख्या वाढली आहे. वटवाघळापासून निर्माण झालेल्या सार्स-कोव्ह-१ आणि सार्स-कोव्ह-२ या दोन विषाणूंचे उगमस्थान याच भागात आहे.  वटवाघळांची मोठी संख्या या भागात आहे. या भागातील वटवाघळांत  अस्तित्वात असलेला विषाणू अन्यत्र गेला. अभ्यासात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे काही भागांतून वटवाघळे नाहीसी झाली, तर काही भागात ती नव्याने पसरली. त्यांच्यासोबत मानवासाठी घातक असलेले विषाणूही नव्या भागात गेले. मध्य आफ्रिका, मध्य व दक्षिण अमेरिका, दक्षिण चीनचा युन्नान प्रांत आणि शेजारील म्यानमार व लाओस येथे वटवाघळांच्या प्रजांतींत मोठी वाढ झाली आहे. हा हवामान बदलांचा परिणाम आहे. म्यानमार आणि लाओस भागात वटवाघळांच्या ४० प्रजाती वाढल्या आहेत. वटवाघळांत आढळणारे १०० नवे कोरोना विषाणू निर्माण झाले आहेत. वटवाघळाची प्रत्येक प्रजाती सरासरी २.६७ कोरोना विषाणूंचे वहन करते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या