Coronavirus: जुलै-ऑगस्टपर्यंत देशात लस तयार होण्याची शक्यता; ‘या’ मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:33 PM2020-05-12T13:33:40+5:302020-05-12T13:46:41+5:30

अद्याप कोरोना व्हायरसवर कोणतीही लस तयार झाली आहे. जगातील बहुतांश संशोधक ही लक्ष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत

Coronavirus: COVID-19 Vaccine Will Come From Hyderabad By August, K Chandrasekhar to PM pnm | Coronavirus: जुलै-ऑगस्टपर्यंत देशात लस तयार होण्याची शक्यता; ‘या’ मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना माहिती

Coronavirus: जुलै-ऑगस्टपर्यंत देशात लस तयार होण्याची शक्यता; ‘या’ मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना माहिती

Next
ठळक मुद्देजुलै-ऑगस्टपर्यंत हैदराबादमध्ये कोरोनावर लस तयार होऊ शकते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती जर असं झालं तर कोरोनाच्या लढाईत भारताला मोठं यश

हैदराबाद – देशात कोरोना बाधितांचा आकडा ७० हजारांच्या वर पोहचला आहे. तर २ हजारांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी भारतात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांची वाढती संख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

अद्याप कोरोना व्हायरसवर कोणतीही लस तयार झाली आहे. जगातील बहुतांश संशोधक ही लक्ष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कोणालाही याबाबत ठोस सांगता येणार नाही की, कोरोनावरील लस कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांना सांगितले की, जुलै-ऑगस्टपर्यंत हैदराबादमध्ये कोरोनावर लस तयार होऊ शकते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांना सांगितले की, कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपल्याच देशात कोरोनावर लस उपलब्ध होईल याची शक्यता आहे. हैदराबादमधील कंपन्या यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे जुलै-ऑगस्टपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकेल. जर असं झालं तर कोरोनाच्या लढाईत भारताला मोठं यश मिळेल असं ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकने याबाबत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना अवगत केले आहे. कोरोनावर लस शोधण्याचं काम प्रगतीपथावर आहे. अन्य अनेक कंपन्यादेखील यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान या बैठकीत राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रेल्वे सेवा सुरु करु नका असा आग्रह धरला. कारण रेल्वे सेवा सुरु केल्यास कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरेल आणि त्याचा धोका बळावण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वेच्या गर्दीमधून कोरोना संक्रमित रुग्ण अन्य व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्याचा संसर्ग वाढण्यास मदत होईल त्यामुळे रेल्वे सेवा सुरु करु नका असा आग्रह के. चंद्रशेखर राव यांनी धरला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! कोरोनावर लवकरच लस मिळणार; जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा दावा!

केंद्र सरकारच्या लॉकडाऊन पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; मोदींच्या रणनीतीवर तज्ज्ञांचा गंभीर आरोप

...आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल

काय सांगता! तलावात मासे पकडायला गेला अन् माशांऐवजी पैशांचे गाठोडं हाती लागलं!

अवघं आसमंत लखलखणार; पुढील २४ ते ३६ तासांत अवकाशात विहंगम दृश्य पाहता येणार

Web Title: Coronavirus: COVID-19 Vaccine Will Come From Hyderabad By August, K Chandrasekhar to PM pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.