शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाची माहिती दडविल्याप्रकरणी देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:35 IST

आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते.

लखनऊ : कोरोनाची लागण झाल्याची माहिती दडविणे व प्रतिबंधक उपाय योजण्यात सरकारला सहकार्य न देणे याबद्दल देशातील पहिला फौजदारी गुन्हा रविवारी आग्रा पोलिसांनी नोंदविला.आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीखेरीज हे दाम्पत्य ग्रीस व फ्रान्सलाही गेले होते.हे दाम्पत्य इटलीहून मुंबईत आले व तेथून बंगळुरुला गेले. तेथे तिच्या पतीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने दोघांनाही विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आले. परंतु तेथून ती ८ मार्च रोजी न सांगता बाहेर पडली. थोडया दिवसांनी तिलाही कोरानाची लागण झाली. यानंतर ही महिला दिल्ली गेली व नंतर रेल्वेने आग्रा येथे माहेरी आली. हा गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हे वडील उत्तर रेल्वेचे कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)बंगळुरूहून गायब, आग्रा येथे सापडलीबंगळुरुहून ‘गायब’ झालेली ही महिला आग्रा येथे आल्याचे कळल्यावर जिल्हा प्रशासनाने ती नेमकी कुठे आहे हे शोधून काढले. अधिकारी तिच्या माहेरी पोहोचले. तिच्या माहेरी एकूण नऊ व्यक्ती राहतात. त्या सर्वांना विलगीकरण वॉर्डात हलविण्याचा अधिकाऱ्यांनी आग्रह धरला. परंतु या महिलेच्या वडिलांनी याला कसून विरोध केला. पण अधिकाºयांनी गय केली नाही. घरातील सर्वांना इस्पितळात नेऊन तपासणी केली गेली. त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोनाCrime Newsगुन्हेगारी