शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

coronavirus : लॉकडाऊनमुळे देश थांबला, दिल्ली, बिहारपासून मुंबईपर्यंत सर्वत्र शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 10:01 IST

एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. अगदी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब अशा सर्वच राज्यात बहुतांश ठिकाणी आज सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाऊनची घोषणा केली होती. रविवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आज सोमवारी सकाळीही अनेकजण घरातच राहणे पसंत करत आहेत. काही तुरळक अपवाद वगळता रस्त्यावर वाहनांची वर्दळही तुरळक दिसत आहे.  राजधानी दिल्लीलाही कोरोना विषाणूचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीत मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत सकाळीपासूनच शुकशुकाट दिसून येत आहे. 

महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बिहारमधील शहरांमधील वर्दळ मंदावली आहे. 

तर उत्तर प्रदेशमधील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जणांकडून भाजीपाला खरोदी केला जात असल्याचे दिसत आहे. 

दक्षिण भारतातही लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. दक्षिणेकडे अनेक शहरे पूर्णपणे बंद आहेत. तसेच लागते लोकांची वर्दळही मंदावली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत