Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:45 PM2021-07-29T12:45:52+5:302021-07-29T12:46:59+5:30

Coronavirus in India: देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Coronavirus: Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy | Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

Next

नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागात आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Coronavirus in India) त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने कोरोनाच्या महामारीसंबंधीच्या नियमांना ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy)

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, लस आणि कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन या पाच सूत्री रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या सणांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोरोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

भल्ला म्हणाले की, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आर्थिक आणि अन्य व्यवहारांना टप्प्याटप्प्याने उघडले जात आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट समाधानकारक आहे. मात्र आताही देशामध्ये सक्रिय रुग्ण हे अपेक्षेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता मिळण्याची शक्यता नाही आहे. निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय हा खूप विचार करून घेतला पाहिजे.

भल्ला यांनी यावेळी १४ जुलै रोजी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेखही केला आहे. त्या त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या आर फॅक्टरमध्ये वाढ होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आर फॅक्टरच्या माध्यमातून एक व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकते, याचा अंदाज बांधला जातो. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिल प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही भल्ला यांनी सांगितले.  

Web Title: Coronavirus: Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.