Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:37 AM2020-03-23T11:37:04+5:302020-03-23T11:42:35+5:30

राजस्थानच्या जोधपूर येथील ३९ वर्षीय इसम दिल्लीहून जयपूरला ट्रेनने आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं.

Coronavirus: Coronavirus Started Spreading On Community Leval, Crucial Results Tomorrow, Says ICMR pnm | Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती

Next
ठळक मुद्दे ज्याठिकाणी लॉकडाऊनची गरज आहे तिथे लॉकडाऊन करावंकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना निर्देश देशात कोरोनाचा सामूहिक स्तरावर प्रार्दुभाव सुरु?

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस हळूहळू जगातील अन्य देशात शिरकाव करत आहे. चीननंतर इटलीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत एका दिवसाला ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे.. वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात १४ हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे भारतात ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ८९ वर पोहचली आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ५३ वरुन वाढून ८९ वर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव किती जलदगतीने होत आहे याचा अंदाज येऊ शकतो.

भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव सामूहिक स्तरावर होणं सुरु झालंय का? या प्रश्नाच्या उत्तरावर भारतीय आरोग्य संशोधन परिषदेचे तज्ज्ञ डॉ. आर.आर गंगाखेडकर यांनी सांगितलं की, याबाबत निश्चित मंगळवारी सांगता येऊ शकेल. भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन(सामूहिक संसर्ग) होत आहे की नाही, हे आता आम्ही सांगण्याच्या स्थितीत नाही. मॅथमेटिकल मॉडलिंगवर काम सुरु आहे. मंगळवारपर्यंत आम्हाला याबाबत माहिती मिळू शकते असं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, केरळ, दिल्लीला फटका

सूरतमध्ये ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये कोरोना लागण झालेले ते पहिले रुग्ण होते. कोणताही परदेश दौरा त्यांनी केला नव्हता. मात्र व्हायरस प्रभावित दिल्ली आणि जयपूर येथे ते गेले होते. गुजरातमध्ये कोरोनाचे ७ रुग्ण आढळले. ज्यातील तिघांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत ८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना निर्देश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले की, कोरोना लागण झालेल्या विभागांची माहिती आणि धोका कितपत आहे त्याचे संकलन राज्यस्तरावर करण्यास सांगितले आहे. ज्याठिकाणी लॉकडाऊनची गरज आहे तिथे लॉकडाऊन करावं. कोरोनाचा प्रार्दुभाव जलदगतीने होत आहे. त्यामुळे संसर्गजन्य कोरोनाची ही चैन तोडणं गरजेचे आहे असं ते म्हणाले.

हलगर्जीपणाचं उदाहरण

राजस्थानच्या जोधपूर येथील ३९ वर्षीय इसम दिल्लीहून जयपूरला ट्रेनने आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. राजस्थानमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २६ आहे. तो अलीकडेच तुर्की येथे गेला होता. १८ मार्चला तो पुन्हा परतला. त्यासह पंजाबमध्ये ७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. बलदेव सिंग यांचे कुटुंब जर्मनी आणि इटलीला फिरुन आले. यातील २ जणांना कोरोनाची लागण आहे. बलदेव सिंग यांचे सहकारी दलजिंदर सिंग परदेशातून परतल्यानंतर लोकांना भेटण्याचं काम करतायेत.

आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, ८० टक्के सामान्य आजाराची लक्षण आहेत त्यांना कोरोना लागण झाल्याचं कळत नाही. २० टक्के लोकांना कोरोनाची लागण झालेली असते. यातील ५ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते. गंभीर स्वरुपाच्या रुग्णांची वेगवेगळी ओळख करण्यात आली आहे. काही औषध संयुक्त मिश्रणाने वापरण्यात येत आहेत. मात्र अद्याप कोणतंही औषध कोरोनावर तयार झालं नाही.

Web Title: Coronavirus: Coronavirus Started Spreading On Community Leval, Crucial Results Tomorrow, Says ICMR pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.