Coronavirus : देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२७ वर; ४१ विदेशी नागरिकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:31 AM2020-03-25T01:31:29+5:302020-03-25T05:30:38+5:30

coronavirus : कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ३७ जण उपचारांनंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे.

Coronavirus: Coronary infection in the country at 527; Including 41 foreign nationals | Coronavirus : देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२७ वर; ४१ विदेशी नागरिकांचा समावेश

Coronavirus : देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२७ वर; ४१ विदेशी नागरिकांचा समावेश

Next

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२७ वर पोहोचली असून त्यामध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
कोरोनामुळे देशात बळी गेलेल्यांची संख्या आता १० झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील मृतांचा समावेश आहे.
कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ३७ जण उपचारांनंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे.
देशभरात या विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि रेल्वे, हवाई तसेच रस्त्यावरील वाहतूक सध्या पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.
केरळमध्ये देशातील कोरोनाचे ९५ रुग्ण असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. कर्नाटकमध्ये ३७, राजस्थानमध्ये ३३, उत्तर प्रदेशमध्ये ३३, तेलंगणामध्ये ३२, दिल्लीत ३१, गुजरातमध्ये २९, हरयाणात २९, पंजाबमध्ये २१ रुग्ण आढळले आहेत.
लडाखमध्ये कोरोनाचे १३, तामिळनाडूत १२, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी ७, छत्तीसगढमध्ये ६, जम्मू-काश्मीरमध्ये ४, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी ३, बिहार, ओडिशामध्ये प्रत्येकी दोन, पुडुचेरी, छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

अतिउत्साहींमुळे धोका
देशात अनेक ठिकाणी संचारबंदी असतानाही अतिउत्साही लोक रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरताना आढळून येत आहेत. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, असे सरकारने वारंवार आवाहन करूनही लोक ती गोष्ट गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला यांच्या खरेदीसाठी लोक दुकाने, मंडयांमध्ये तोबा गर्दी करताना दिसत आहेत.
यामुळे कोरोनाच्या फैलावाचा धोका आणखी वाढणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकार लोकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहे.

Web Title: Coronavirus: Coronary infection in the country at 527; Including 41 foreign nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.