शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

coronavirus: कोरोनाबाधित महिला डॉक्टरने १४व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 3:38 PM

coronavirus in India : महिला डॉक्टर आणि तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिने...

ग्रेटर नोएडा - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याबरोबरच कोरोना विषाणू हा अनेकांसाठी मानसिक त्रासाचेही कारण ठरत आहे. (coronavirus in India) त्यातून काही जणांकडून टोकाचे पाऊल उचलण्यासारखी कृत्यं केली जाच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. येथे एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ( Corona positive female doctor commits suicide by jumping from 14th floor)

ही घटना ग्रेटर नोएडामधील सूरजपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. येथील एक महिला डॉक्टर आणि तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. ते सेक्टर १३७ मधील पॅरामाऊंट सोसाटीमध्ये वास्तव्यास होते. येथील १४ व्या मजल्यावरून उडी मारून या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ९८ टक्के रुग्ण हे बरे होतात. त्यामुळे कोरोना झाल्यावर घाबरून जाऊ नका, तर खबरदारी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. 

दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या फैलाव वेगात सुरू असून, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ३ लाख ४६ हजार ७८६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २ हजार ६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख १९ हजार ८३८ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ६६ लाख १० हजार ४८१ एवढी झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश