शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus: यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 1:33 PM

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकेंद्र सरकारवर टीकास्त्रकाँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेची मदत करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आणखीनच गंभीर होताना पाहायला मिळत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला  या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. यंत्रणा कोलमडली आहे. आता 'जन की बात' करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (rahul gandhi criticised pm narendra modi on mann ki baat)

अलीकडेच राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते गृह विलगीकरणात आहेत. राहुल गांधी सातत्याने देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला. यावरून आता राहुल गांधी यांनी टीका केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी

काय म्हणतात राहुल गांधी?

यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS 

केंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट

केंद्र सरकारच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला. स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. 

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ रुग्ण उपचाराधीन आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMan ki Baatमन की बातPoliticsराजकारण