Coronavirus: CM K Chandrasekhar Rao suggested extension of lockdown for 2 more weeks pnm | Coronavirus: १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याची शिफारस; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

Coronavirus: १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याची शिफारस; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

ठळक मुद्देपंतप्रधानांनी राज्यांना अहवाल पाठविण्यास सांगितले होतेया आठवड्याच्या अखेरीस राज्यांचा अहवाल केंद्राला मिळणार लॉकडाऊन वाढविण्याबाबत तेलंगणा सरकारची शिफारस

हैदराबाद – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव देशात वाढत असताना कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. १४ एप्रिलपर्यंत सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पण कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लॉकडाऊनबाबत सरकारने राज्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. देशात १०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

१४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार की वाढवणार याबाबत विविध चर्चा सुरु असताना तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ३ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली आहे. तेलंगणामध्ये आतापर्यंत ३६४ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यातील ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्य सरकारने ही शिफारस केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या ८९० वर पोहचली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे गरजेचे आहे. लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपेल, मग लोकांना कसे नियंत्रित करावे हे सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे. यासाठी आवश्यक धोरणे तयार करावी लागतील. लॉकडाऊन संपताच लाखो लोक घराबाहेर पडतील आणि रस्त्यावर उतरतील याचे नियोजन करावे लागणार आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले होते की आपण आपल्या सर्व राज्यातील लॉकडाऊन कसे काढू शकता. आपल्या राज्यांच्या स्थितीच्या आधारे, यावर एक अहवाल तयार करा आणि तो केंद्राकडे पाठवा. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्यांनी पाठविलेल्या अहवालावरुन आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावरुन लॉकडाऊन हटविण्याची रणनीती आखत आहे.

केंद्र सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार लॉकडाऊन एकाच टप्प्यात उघडला जाईल. परंतु कोरोना विषाणूचा जास्त परिणाम झालेल्या सर्व राज्यात लॉकडाऊन सुरूच राहणार आहे. देशात जेथे जेथे लॉकडाऊन उठवण्यात येईल तेथे कलम १४४ लागू केला जाईल जेणेकरून चारपेक्षा जास्त लोक एकाच ठिकाणी जमू शकणार नाहीत असंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, सर्व प्रकारच्या खाजगी वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येतील. यात बस सेवा, टॅक्सी, ऑटोचा समावेश आहे. फक्त अत्यावश्यक सेवांशी संबंधित गाड्या धावतील. ३० एप्रिलपर्यंत रेल्वे सेवा आणि हवाई सेवा बंद राहतील. टप्प्याटप्प्याने या सेवा सुरु करण्यात येईल. या आठवड्याच्या अखेरीस सर्व राज्य सरकार लॉकडाऊन हटविण्याबाबत आपला अहवाल केंद्राकडे पाठवतील. त्यामध्ये राज्य सरकारची रणनीती काय असेल हे समजणार आहे.

Web Title: Coronavirus: CM K Chandrasekhar Rao suggested extension of lockdown for 2 more weeks pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.