शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

coronavirus: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी जनतेला होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 5:07 PM

coronavirus in India : कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे, तसेच गोरगरिबांचे मोठ्या प्रमामात हात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून, या लाटेमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर इतरही काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे, तसेच गोरगरिबांचे मोठ्या प्रमामात हात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Central government's major decision against the backdrop of increasing coronavirus infection, 80 crore people will benefit Free Food)

देशातील अनेक राज्यात वाढलेला कोरोना आणि कोरोनाला रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्याचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मे आणि जून महिन्यांमध्ये गरीबांना प्रत्येकी पाच किलो धान्य दिले जाणार आहे.  या योजनेचा लाभ देशातील तब्बल ८० कोटी जनतेला होणार असून, यासाठी केंद्र सरकारने तब्बल २६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

या निर्णयावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कोरोनाच्या दुसऱ्या साथीचा सामना करत असताना हा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. सुमारे २६ हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च होणार आहेत. 

दरम्यान, देशात कोरोनाच्या विषाणूचा फैलाव अधिकच वाढत चालला आहे. आज देशभरात कोरोनाच्या ३ लाख ३२ हजार ७३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात देशभरात तब्ब्ल २२६३ रुग्णांचा मृत्यू झाला.  तर दिवसभऱात १ लाख ९३ हजार २७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतfoodअन्न