Coronavirus : सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:26 IST2020-03-18T23:47:25+5:302020-03-19T07:26:37+5:30
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Coronavirus : सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली
नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईच्या सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे १९ मार्चपासून होणारे सर्व पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. बोर्डाने १९ ते ३१ मार्च दरम्यान होणारे सर्व पेपर आता ३१ नंतर घेण्याचे जाहीर केले आहे.
HRD Ministry asks CBSE to postpone all exams including JEE Mains in view of COVID-19 till March 31
— ANI Digital (@ani_digital) March 18, 2020
Read @ANI story | https://t.co/r0KkXOyl9Epic.twitter.com/EeXlVDSdCl
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 150 हून अधिक झाली आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.