शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

CoronaVirus : "कर्मचारी अन् जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करायला हवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 16:58 IST

महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी लाखो कोटींचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द का केला नाही?, असा थेट सवालच राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटामुळे देशात टाळेबंदी असून, अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अर्थव्यवस्था घसरत असतानाही मोदी सरकारनं गोरगरीब जनता आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्याला कात्री लावली आहे.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे देशात टाळेबंदी असून, अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अर्थव्यवस्था घसरत असतानाही मोदी सरकारनं गोरगरीब जनता आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्याला कात्री लावली आहे. त्यावरूनच आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी लाखो कोटींचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द का केला नाही?, असा थेट सवालच राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे.कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यीकरण परियोजना यांसारख्या योजना रद्द करण्याऐवजी कोरोनाशी लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात (DA) कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे, असं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे.  देशातील १ कोटी १३ लाख विद्यमान व माजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील दीड वर्ष महागाई व दिलासा भत्त्यावर पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारची ३७ हजार ५३० कोटी रुपयांची बचत होणार आहे. सर्व राज्यांनी अशीच कपात केल्यास केंद्र आणि राज्यांची मिळून १ लाख २० हजार कोटींची बचत होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२०पासून द्यायचे अतिरिक्त महागाई तसेच दिलासा भत्ते रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र, त्यांना सध्याच्या १७ टक्के दराने महागाई भत्ता मिळेल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. आणखी हेसुद्धा वाचा

Coronavirus : आता बँकांना ६ महिन्यांपर्यंत करता येणार नाही संप, सरकारनं बनवला कायदा

Coronavirus : मोदी सरकार दुसरं मोठं पॅकेज देण्याच्या तयारीत; 48 तासांमध्ये होऊ शकते घोषणा

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याBullet Trainबुलेट ट्रेन