शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 08:49 IST

Coronavirus : राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या भीलवाडामधील एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

भीलवाडा - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोनाग्रस्तांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक आहे. तर एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या भीलवाडामधील एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. भीलवाडा येथील एक दाम्पत्य दिवसभर घराबाहेर राहून देशसेवा करत आहेत. कोरोना वॉरियर्स असलेल्या या दाम्पत्याला एक सात वर्षांची मुलगी आहे. मात्र कामानिमित्त सतत बाहेर राहावं लागत असल्याने हे आपल्या लेकीला घरामध्ये कुलूप लावून बंद करून ठेवतात. विशेष म्हणजे पती वैद्यकीय विभागात काम करतात तर पत्नी पोलीस आहेत. मात्र देशसेवा करताना मुलीला घरात एकटं ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाड्याचे रहिवासी असलेले दिलखूश हे जिल्हा मुख्यालयातील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात कंपाऊडर आहेत. तर दिलखूश यांची पत्नी सरोज राजस्थानपोलिसात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. भीलवाड्यात कोरोनामुळे 20 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. यापुढे 13 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. हे दोन्ही दाम्पत्य अशा ठिकाणी काम करतं की त्यांनी कामासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. या दाम्पत्याला सात वर्षांची मुलगी असून दिक्षिता असं तिचं नाव आहे. ही चिमुकली गेल्या 10 दिवसांपासून आई-बाबा कामावर असल्याने घरात एकटी राहते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लॉकडाऊनमुळे चिमुकलीला सांभाळायला कुटुंबातील कोणतीच व्यक्ती येऊ शकत नाही. त्यामुळे या दाम्पत्याने आपल्या मुलीला कुलूप लावून घरात बंद करून ठेवलं आहे. दिलखूश रुग्णालयात सलग 10 दिवस ड्यूटीवर होते. ते घरात आले तरी मुलीला भेटू शकत नाही. कारण सलग 10 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर त्यांना पुढील 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागते. तर दिक्षिताची आई सरोजदेखील कर्फ्यूदरम्यान शहरात आपल्या टीमसोबत फिरत असताना लोकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन देत असते. कामावरून त्या 8-9 तासांनी घरी येते. अशा परिस्थिती त्यांची लेक दिवसभर घरात एकटी असते.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus लॉकडाउन संपणार की वाढणार? आज ठरणार

CoronaVirus कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुुरुवात?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानIndiaभारतhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसDeathमृत्यू