CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:34 IST2020-03-28T04:02:28+5:302020-03-28T05:34:37+5:30
coronavirus : एकीकडे भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे.

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-१९ रोगाने मरण पावलेल्याची संख्या २० वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत नवीन ७५ रुग्ण आढळले.
एकीकडे भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. शुक्रवारी केरळमध्ये ३९ आणि मुंबईत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ९ रुग्ण आढळले. जम्मू-काश्मिरमध्ये आणखी चौघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून यापैकी दोघे विदेशातून आले होते.