coronavirus: देशभरात एका दिवसात ८३,८८३ नवे रुग्ण, बाधित ३८ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:14 AM2020-09-04T06:14:48+5:302020-09-04T06:15:34+5:30

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे.

coronavirus: 83,883 new patients in one day, over 38 lakh infected across the country | coronavirus: देशभरात एका दिवसात ८३,८८३ नवे रुग्ण, बाधित ३८ लाखांवर

coronavirus: देशभरात एका दिवसात ८३,८८३ नवे रुग्ण, बाधित ३८ लाखांवर

Next

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ८३,८८३ नवे रुग्ण आढळून आले असून, हा आजवरचा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७ टक्क्यांहून अधिक असून, अशा व्यक्तींची संख्या २९ लाखांहून जास्त झाली आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३८,५३,४०६ झाली असून, बरे झालेल्यांची संख्या २९,७०,४९२ इतकी आहे. या आजारामुळे आणखी १,०४३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ६७,३७६ झाली आहे. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकापेक्षा अधिक व्याधी जडलेल्या होत्या.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. देशात दररोज होणाºया कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ, रुग्णांना त्वरित मिळणारे वैद्यकीय उपचार यामुळे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

एका दिवसात ११ लाख ७२ हजार कोरोना चाचण्या
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबर रोजी देशामध्ये ११,७२,१७९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील संख्येचा हा उच्चांक आहे. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,५५,०९,३८० झाली आहे. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने राखले होते. ते याआधीही दोन-तीनदा गाठले होते; पण आता निर्धारित लक्ष्यापेक्षा आणखी एक लाख चाचण्या अधिक करून सरस कामगिरी करण्यात आली आहे.

8,15,538 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या २१.१६ टक्के इतकी आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ७ आॅगस्ट रोजी, तर ३० लाखांचा आकडा २३ आॅगस्ट रोजी ओलांडला होता.

कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,५१६, कर्नाटकमध्ये ५,९५०, दिल्लीत ४,४८१, आंध्र प्रदेशमध्ये ४,१२५, उत्तर प्रदेशमध्ये ३,६१६, पश्चिम बंगालमध्ये ३,३३९, गुजरातमध्ये ३,०४६, पंजाबमध्ये १,६१८ इतकी आहे.

५ राज्यांत कोरोनाचे ६२% रुग्ण, महाराष्टÑ पहिल्या, तर आंध्र दुसºया स्थानी

देशात कोरोनाच्या चाचण्या वाढण्याबरोबरच संक्रमणही घटत आहे. कोरोनाच्या काळात जीवन महत्त्वपूर्ण आहे व जीवनासाठी उदरनिर्वाह महत्त्वाचा आहे. म्हणूनच राज्यांशी विचारविनिमय केल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू केले जात आहेत. २४ तासांत ११.७२ लाख विक्रमी चाचण्या करण्यात आल्या. यातील पॉझिटिव्हिटी दर ७.२० टक्के आहे. एका दिवसात सर्वाधिक ६८,५८४ कोरोना रुग्ण संक्रमित झाले. याबरोबरच कोरोनातून बरे होणारांची संख्या २९,७०,४९२ झाली आहे. बरे होणारांचे प्रमाण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा ३.६ पट जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सचिव राजेश भूषण यांनी दिली.

दररोज ९.५ लाख चाचण्या केल्या जात आहेत. शास्त्रज्ञ रात्रंदिवस लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत व चाचण्या घेत आहेत. मंत्रालयाकडून वित्त, व्यवस्थापन, कोल्ड चेन, परिवहन व लसीच्या संरक्षणाची व्यवस्था होत आहे. पाच राज्यांत कोरोनाचे ६२ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित ३७.६६ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अन्य राज्यांत आहेत.

महाराष्टÑात सर्वाधिक २४.७७ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश १२.६४ टक्के, कर्नाटक ११.५८, उत्तर प्रदेश ६.९२ व दिल्लीत ६.४२ टक्के रुग्ण आहेत. पाच राज्यांत मागील तीन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या महाराष्टÑात ६.८ टक्के, तामिळनाडूत २३.९ टक्के, कर्नाटकात १६.१ टक्के, आंध्रात १३.७ टक्के व उत्तर प्रदेशात १७.१ टक्के कमी झाली आहे. देशातील ७० टक्के मृत्यू याच राज्यात झालेले आहेत. महाराष्टÑात ११.५ टक्के, आंध्रात ४.५ व तामिळनाडूत १८.२ टक्के मृत्यूदरात घट झाली आहे.

Web Title: coronavirus: 83,883 new patients in one day, over 38 lakh infected across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.