शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

CoronaVirus News: पूर्ण बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आता ७० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 3:21 AM

एकूण रुग्णसंख्या २३ लाख; ४६,०९१ जणांचा बळी

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या २३ लाखांहून अधिक झाली आहे. या आजारामुळे आणखी ८३४ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या ४६,०९१ वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या २३,२९,६३८ असून, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १६,३९,५९९ झाली आहे. बुधवारी ५६,११० जण कोरोनातून बरे झाले. पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७०.३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. बुधवारी कोरोनाचे ६०,९६३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या १२ दिवसांत कोरोनाचे ६,३३,६५० नवे रुग्ण सापडले आहे.देशात सध्या ६,४३,९४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संसर्गातून पूर्ण बरे झालेले व उपचार सुरू असलेले यांच्या संख्येत सध्या ९,९५,६५१ इतक्या संख्येचा फरक आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून, त्यातून रुग्णांचा शोध घेऊन वेळीच उपचार केल्यामुळे या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोरोना साथीचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आदी दहा राज्यांनी या संसर्गाचे रुग्ण शोधण्यावर व त्यांच्यावर वेळीच उपचार होण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण या दहा राज्यांतील आहेत, तसेच एकूण बळींपैकी ८२ टक्के जणांचा मृत्यू या दहा राज्यांत झाला होता.कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २ कोटी ६० लाखांवरइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी ७,३३,४४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता २,६०,१५,२९७ वर पोहोचली आहे.बिहारमध्ये दर दहा लाखाला कोरोना चाचण्यांचे प्रमाण आहे९,१८०हेच प्रमाण गुजरातमध्ये१४,९७३उत्तर प्रदेशमध्ये१४,२६६पश्चिम बंगालमध्ये११,६८३तेलंगणामध्ये१६,७८८आहे, तर राष्ट्रीय स्तरावर दरदहा लाखांमागे कोरोना चाचण्यांचे प्रमाण १८,९६८ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या