coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:14 AM2020-05-20T10:14:20+5:302020-05-20T10:25:47+5:30

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.

coronavirus: 5,611 patients found in a single day BKP | coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण

coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण

Next
ठळक मुद्देमंगळवारी देशभरात कोरोनाचे पाच हजार ६११ नवे रुग्ण सापडले आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख ६ हजार ७५० रुग्ण सापडले आहे४२ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रात्प आकडेवारीनुसार सध्या देशात ६१ हजार १४९ रुग्ण आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत आहे. सोमवारी एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी तब्बल पाच हजार ६११ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या आकडेवारीनुसार मंगळवारी देशभरात कोरोनाचे पाच हजार ६११ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात आढळलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच एका दिवसात सर्वाधिक सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मंगळवारी दिवसभरात देशामध्ये १४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख ६ हजार ७५० रुग्ण सापडले आहे. पैकी ३ हजार ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रात्प आकडेवारीनुसार सध्या देशात ६१ हजार १४९ रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या

म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण... 

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांवर, पण देशवासियांसाठी ही आहे दिलासादायक खबर 

केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

 दरम्यान, भारतातील राज्यांचा विचार केल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 2127 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 37136 एवढी झाली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या २२५६३ पर्यंत पोहोचली असून, आज दिवसभरात मुंबईत १४११ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मंगळवार १९ मे रोजी नवीन 1202 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9639 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 26164 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: coronavirus: 5,611 patients found in a single day BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.