coronavirus: केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 02:48 PM2020-05-19T14:48:53+5:302020-05-19T14:52:59+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

coronavirus: Delhi gets full support from central government - Kejriwal BKP | coronavirus: केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

coronavirus: केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

Next
ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेतआम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यात दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काँग्रेसशासित राज्ये केंद्र सरकारवर सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या मदतीबाबत केजरीवाल म्हणाले की, सद्यस्थितीत केंद्र सरकारबाबत आपली काहीच तक्रार नाही. या संकटाच्या काळात केंद्र सरकारने दिल्लीसोबत सापत्न वागणुकीसारखे काही केले नाही. आम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली. मात्र ही बाब म्हणजे केंद्र सरकारसोबत मैत्री वगैरे काही नाही. पण दिल्ली सरकार सध्या कुठल्याही विवादात पडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी 

सदस्य देशांच्या दबावासमोर WHO झुकली, कोरोना विषाणूसंबधी तपासास मान्यता

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

दरम्यान, दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. तसेच स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिल्लीमधून किमान ५० ते १०० ट्रेन चालवण्यात आल्या पाहिजेत, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. तसेच दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला. 

Web Title: coronavirus: Delhi gets full support from central government - Kejriwal BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.