शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नागावमधील ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद, पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसची संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 03:22 IST

जगभरात कोरोनाच्या विषाणूने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत १६३ देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रायगड जिल्हा विशेषत: अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. येथील नागावची ओळख कॉटेजचे गाव अशी आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पर्यटकांचा राबता असतो. गो कोरोना...गो... यामाध्यमातून नागाव परिसरातील तब्बल ५०० कॉटेज, हॉटेल्स आणि परमिट रूम बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रोजगारावर कोरोना व्हायरसची संक्रांत आल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.जगभरात कोरोनाच्या विषाणूने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत १६३ देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याचा आकडा वाढत आहे. एक लाख ९६ हजार ७२३ हून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी सात हजार ९२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ८१ हजार ६८३ कोरोनाग्रस्त बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरानाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने चीन या देशाला झाला आहे. त्यापाठोपाठ इटली, इराण, स्पेन आणि द. कोरिया यांना जास्त फटका बसला आहे.जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत तातडीने पावले उचलली आहेत. गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन सातत्याने राज्य तसेच जिल्हा पातळीवरून करण्यात येत आहे. कोरोनाबाबत सतर्कता हाच प्रामुख्याने आणि मोठा उपाय असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने १९९७ सालच्या साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, पर्यटनस्थळे, जलतरण तलाव, जिम, शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारी कार्यक्रम, सभा, समारंभ अशा कार्यक्रमांवरही बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात पर्यटनावर आधारित विविध व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांनाही आता मज्जाव करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे मोठ्या संख्येने कॉटेजेस, रेस्टारंट, हॉटेल्स आणि परमिट रूम आहेत, त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने अशा व्यवसायांवर बंदी घालणे गरजेचेहोेते.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागाव ग्रामपंचायतीने लॉजेस, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक यांची बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लॉजेस, रिसॉर्ट बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला आहे. सुमारे ५०० हॉटेल्स, लॉज, कॉटेजेस, रेस्टारंट बंद केली आहेत. त्यामुळे गजबजलेला नागाव परिसर हा सुनासुना झाला आहे, तर येणाऱ्या तुरळक पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.जिल्ह्यात पर्यटनाला मोठा फटकाजिल्ह्यातील पर्यटनाला कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू लागला आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारे ही आता निर्मनुष्य दिसू लागले आहेत. नेहमी गजबजलेले नागाव सध्या पर्यटकांविना सुनेसुने झाले आहे. शनिवार, रविवार आणि सलग लागून सुट्ट्या आल्या की मुंबई, पुणे, ठाणे येथून नागाव समुद्रकिनाºयावर पर्यटक मजा करण्यासाठी वाहनाने आणि जलवाहतुकीने येत असतात. त्यामुळे नागाव व आजूबाजूचा परिसर समुद्रकिनारे, हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्टही पर्यटकांनी गजबजून जातात. पर्यटकांमुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र, कोरोना विषाणूमुळे सध्या पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यावर आधारित असणारे व्यावसायिक चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.नागाव समुद्रकिनाºयावर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. वीकेण्डला हजारो पर्यटक मौजमजेसाठी येथे येत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता ३१ मार्चपर्यंत नागाव गावातील ग्रामस्थांना आपापले कॉटेज व हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देत सुमारे ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद ठेवले आहेत.- निखिल मयेकर, नागाव, सरपंचप्रशासनाचा निर्णय योग्यजिल्ह्यातील अलिबाग, मुरु ड, श्रीवर्धन या ठिकाणच्या सर्वच समुद्रकिनारी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा फटका हा पर्यटन व्यवसायाला बसू लागला आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांच्या आरोग्य दृष्टीने घेतलेला जिल्हा प्रशासनाचा निर्णय हा योग्य असल्याचे मत हॉटेल व्यावसायिक दिनकर कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड