CoronaVirus : देशात ४० हजार नवे रुग्ण, ११० दिवसांतील सर्वांत मोठी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:48 AM2021-03-20T04:48:18+5:302021-03-20T06:52:55+5:30

२९ नोव्हेंबर रोजी देशात कोरोनाचे ४१,८१० नवे रुग्ण सापडले होते. आता हा आकडा काही दिवसांत गाठला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८ टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी भारताने कमी मृत्युदर राखण्यात यश मिळविले आहे.

CoronaVirus : 40,000 new patients in the country, the largest number in 110 days | CoronaVirus : देशात ४० हजार नवे रुग्ण, ११० दिवसांतील सर्वांत मोठी संख्या

CoronaVirus : देशात ४० हजार नवे रुग्ण, ११० दिवसांतील सर्वांत मोठी संख्या

Next

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी ३९,७२६ नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वांत मोठा आकडा आहे. शुक्रवारी १५४ जण मरण पावले असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. 

२९ नोव्हेंबर रोजी देशात कोरोनाचे ४१,८१० नवे रुग्ण सापडले होते. आता हा आकडा काही दिवसांत गाठला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८ टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी भारताने कमी मृत्युदर राखण्यात यश मिळविले आहे. कोरोनातून बरे झालेल्या ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सहा महिन्यांनंतर पुन्हा या संसर्गाची बाधा होण्याचा मोठा धोका आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. 

चीनच्या वन्यप्राणी केंद्रांत उगमस्थान
कोरोनाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून हवेत मिसळल्याची शक्यता नाकारतानाच, या विषाणूचे उगमस्थान दक्षिण चीनमधील वन्यप्राणी पालनकेंद्रात असावे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर दसझॅक यांनी केला आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी चीनचा दौरा केला, त्यात पीटर यांचा समावेश होता. 
 

Web Title: CoronaVirus : 40,000 new patients in the country, the largest number in 110 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.