शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:03 IST

कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देपरदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहेयापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातीलएका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. दरम्यान, परदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पुढच्या आठवड्यात तब्बल ६४ विमानांमधून परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना परत आणले जाणार आहे.

 या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अमेरिका, कुवेत, फिलिपिन्स, बांगलादेश, सौदी अरेबिया, मलेशिया आणि संयुत्च अरब अमिरातीसाठी विशेष उड्डाणे होणार आहेत. यापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातील. तसेच एका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.  

परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्याच्या मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी १० विमानांमधून २ हजार ३०० लोकांना परत आणले जाईल. भारतातून निघालेली ही विमाने अमेरिका, फिलिपिन्स, सिंगापूर, बांगलादेश, यूएई, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेतसारख्या देशामधून लोकांना घेऊन येतील.  

महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर

 

दुसऱ्या दिवशी सुमारे २ हजार ५० भारतीयांना नऊ विविध देशांमधून चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली येथे आणले जाईल. त्यानंचर पुढच्या दिवशी अमेरिका, मध्यपूर्व देश, युरोप आणि दक्षिण पूर्व आशियामधील १३ देशातून दोन हजारांहून अधिक लोकांना मुंबई, कोची ,लखनौ आणि दिल्ली येथे आणले जाईल.  

दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्याच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच नौदलाने आखाती देशात अडकलेल्या १० हजार भारतीयांना परत आणण्यासाठी  नौदलाकडून तीन युद्धनौका पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAir Indiaएअर इंडिया