शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

CoronaVaccineUpdate : यूपी, बिहार, एमपीसह देशातील 'या' राज्यांत सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:16 PM

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. (CoronaVaccine)

नवी  दिल्ली - केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, सर्वप्रथम उत्तर प्रदेशने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. यानंतर मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड आदी राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. (People will get free corona vaccine in these states including Uttar Pradesh Madhya pradesh Bihar kerala and assam)

आता केरल सरकारनेही म्हटले आहे, की ते आपल्या राज्यातील लोकांना मोफत कोरोना लस देणार आहेत. मुख्यमंत्री पिनरई विजयन बुधवारी सायंकाळी म्हणाले, की त्यांचे सरकार 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत कोरोना लस देईल. विजयन म्हणाले, राज्य सरकारांना लस खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे राज्यांवर आधीच मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्यांना आर्थिक संकटाकडे लोटण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांना मोफत कोरोना लस पुरवावी.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

मोफत लशीसंदर्भात काय म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री?उत्तर प्रदेशात मोफत कोरोना लस देण्याची घोषणा करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, राज्य सरकार आपल्याकडे असलेल्या साधनांचा वापर करून लसीकरण कार्यक्रम पुढे नेईल. लसीकरण अभियान व्यापक स्थरावर चालविण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. आपल्याला लसीकरण केंद्र वाढवावे लागतील. यावेळी त्यांनी लशींसाठी कोल्ड चेनसह सुरक्षित साठवणूक आणि परिवहनासाठीही व्यवस्था करण्यावर भर दिला. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

बिहारमध्ये आधीपासूनच मिळतेय मोफत लस -बिहारमध्ये आधीपासून कोरोना लसीकरण मोफत सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच एनडीएने सत्तेत आल्यास मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यानंतर, सत्तेत येताच कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मोफत कोरोना लस देण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आले होते. तेव्हापासूनच राज्यात सर्वांना मोफत कोरोना लस दिली जात आहे. विशेष म्हणजे येथे खासगी रुग्णालयांतही मोफत कोरोना लस दिली जात आहे. बुधवारी स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत सर्वांना मोफत कोरोना लस देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

मोफत लशीसंदर्भात काय म्हणाले आसाम सरकार?आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा बुधवारी म्हणाले, राज्य सरकार 1 मेपासून 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या लोकांचे मोफत लसिकरण करेल. ते म्हणाले, गेल्या वर्षी कोविड-19चा सामना करण्यासाठी मिळालेल्या मदत निधीचा वापर, या कामासाठी करण्यात येईल. राज्य सरकारने आधीच भारत बायोटेकला लशीच्या एक कोटी डोससाठी पत्र लहिले आहे. सरमा यांनी मंगळवारी रात्री उशिरा ट्विट केले, की ''आसाम 18 ते 45 दरम्यानच्या सर्वांनाच मोफत कोरोना लस देईल. भारत सरकार 45 वर्षांवरील नागरिकांना आधीच मोफत लस देत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBiharबिहारKeralaकेरळ