शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

CoronaVaccine News : लवकर उपलब्ध होऊ शकेल कोरोना लस! ट्रायलबरोबरच होऊ शकतो रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 11:28 IST

लशीची मान्यता प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी, ही लस यूनायटेड किंगडममध्ये आधीपासूनच अॅक्‍सिलेरेटेड रिव्‍ह्यूमध्ये आहे. कोरोना लशीसाठी तयार करण्यात आलेल्या  नॅशनल एक्‍सपर्ट ग्रुपच्या (NEGVAC) एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देजवळपास सर्वच देश सुरक्षित कोरोना लशीची डोळे लावून  वाट पाहत आहेत.भारत सरकारदेखील कोरोना व्हायरसवरील लशीच्या रोलिंग रिव्‍ह्यूचा निर्णय घेऊ शकते.विशेषकरून ऑक्‍सफर्ड-एस्‍ट्राजेनेकाची लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.

नवी दिल्ली - संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे हैरान आहे. जवळपास सर्वच देश सुरक्षित कोरोना लशीची डोळे लावून  वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारदेखील कोरोना व्हायरसवरील लशीच्या रोलिंग रिव्‍ह्यूचा निर्णय घेऊ शकते. विशेषकरून ऑक्‍सफर्ड-एस्‍ट्राजेनेकाची लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.

लशीची मान्यता प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी, ही लस यूनायटेड किंगडममध्ये आधीपासूनच अॅक्‍सिलेरेटेड रिव्‍ह्यूमध्ये आहे. कोरोना लशीसाठी तयार करण्यात आलेल्या  नॅशनल एक्‍सपर्ट ग्रुपच्या (NEGVAC) एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात संकेत दिले आहेत. भारतात ऑक्‍सफर्डच्या लशीचे ट्रायल सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) करत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात ही ट्रायल कमी सॅम्पल साइजने होत आहे. रोलिंग रिव्‍ह्यूच्या माध्यमाने या लशीचे इव्हॅलुएशन प्रोसेस वेगाने केले जाऊ शकते. 

अशा पद्धतीने केला जातो लशीचा रोलिंग रिव्ह्यू -एखाद्या लशीच्या रोलिंग रिव्‍ह्यूने रेग्यूलेटर्सना तिच्या क्लिनिकल ट्रायलचा डेटा रिअल-टाईम बेसिसवर तपासण्यासाठी मिळतो. सर्वसाधारणपणे कंपन्या सर्वप्रथम लशीचे ट्रायल करतात आणि नंतर त्यांचा डेटा रेग्यूलेटर्सना पाठवतात. 'रोलिंग रिव्ह्यू'मध्ये ट्रायल पूर्ण होण्याची वाट न पाहता भाग निहाय तपासणी होते. तसेच इमरजंसीमध्ये लशीला मंजुरी दिली जाऊ शकते. मात्र, रोलिंग रिव्‍ह्यूमुळे लशीची मान्यता प्रक्रिया अधिक वेगाने होते. यात रेग्यूलेटर्सना तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल संपण्याची वाट पाहावी लागत नाही.

यूकेच्या धरतीवर भारतातही रोलिंग रिव्‍ह्यू शक्य -यूके आणि ब्राझीलमध्येही ऑक्‍सफर्ड-एस्‍ट्राजेनकाच्या लशीचे परीक्षण सुरू आहे. त्याचा डेटाही भारतीय रेगुलेटरसोबत शेअर करण्यात येणार आहे. कारण यूकेमध्ये मेडिसिन्स अँड हेल्‍थकेअर प्रॉडक्‍ट्स रेग्यूलेटरी अथॉरिटी (MHRA) संभाव्य लशीचे रोलिंग रिव्‍ह्यू करत आहे. कंपनी भारतातही अशा प्रकारच्या प्रोसेसची मागणी करू शकते.

परदेशातील ट्रायलवर भारताची नजर -नुकतेच SIIचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले होते, की या लशीचा सुरुवातीच्या ट्रायलमध्ये चांगला रिझल्ट आला आहे. मात्र, या लशीच्या परदेशात होत असलेल्या तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल्‍ससंदर्भात जाणण्याची सरकारची इच्छा आहे.

सीरम इंस्टिट्यूटला अप्‍लाय करावे लागेल -जागतिक स्थरावर आमचे लक्ष आहे. सीरम केवळ इम्‍युनोजेनिसिटी ट्रायल करत आहे. त्यांना यूके आणि ब्राझील येथील तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायलचा क्लिनिकल डेटाही आम्हाला द्यावा लागेल. अम्हाला माहीत आहे, की यूके लशीसंदर्भात एक्‍सिलेरेटेड रिव्‍ह्यू करत आहे. यासाठी कंपनीने अर्ज केल्यास आपणही यासंदर्भात विचार करू शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतmedicineऔषधं