शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

स्वदेशी लसींच्या बळावरच कोरोनाला हरविणार -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 4:57 AM

कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे आहे.

नवी दिल्ली : भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे आहे. ‘दवाई भी, कड़ाई भी’ (औषधही व नियमांचे पालनही) ही घोषणा नागरिकांनी कायम ध्यानात ठेवायची आहे.मोदी यांनी सांगितले की, देशाने अगदी कमी वेळात एक नाही, तर दोन स्वदेशी कोरोना लस बनविल्या आहेत. कोरोना लसी आहेत संजीवनी : आरोग्यमंत्री हर्षवर्धन -कोरोना प्रतिबंधक लसी या संजीवनी औषध आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. कोरोना लसीकरण मोहिमेबद्दल पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. वैद्यकीय तज्ज्ञांची या मोहिमेबद्दलची मते प्रमाण माना. कोरोना लसीकरण मोहीम देशातील जनतेने यशस्वी करून दाखवावी, असे असे आवाहनही डॉ. हर्षवर्धन यांनी केले.

कोरोनाबळींच्या आठवणींनी मोदी भावुक --  कोरोना साथीमध्ये नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. त्याचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. ते म्हणाले की, या साथीमुळे अनेक जण मरण पावले, त्यांच्यावर एकाकी अवस्थेत अंत्यसंस्कार करावे लागले. -  अंतिम संस्कारांच्या वेळेस जे पारंपरिक विधी केले जातात तेही या काळात मृतांच्या नातेवाइकांना करता आले नाहीत. कोरोना साथीमुळे अनेक डॉक्टर, आरोग्यसेवक, तसेच कोरोना योद्धे मरण पावले. त्या सर्वांची आठवण काढताना मोदी यांचा कंठ दाटून आला होता.

साथ नष्ट होणे अशक्य -कोरोना साथीचा जगात एकही रुग्ण उरला नाही अशी स्थिती निर्माण होणे अशक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसmedicineऔषधंcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या