Corona Virus Update : २४ तासांत कोरोनाने घेतले ७ बळी, २७६ नव्या रुग्णांची भर! देशभरात किती सक्रिय रुग्ण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:08 IST2025-06-04T13:07:02+5:302025-06-04T13:08:26+5:30

गेल्या २४ तासांत तब्बल ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २७६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Corona Virus Update: 7 Corona death in 24 hours, 276 new patients added! How many active patients are there in the country? | Corona Virus Update : २४ तासांत कोरोनाने घेतले ७ बळी, २७६ नव्या रुग्णांची भर! देशभरात किती सक्रिय रुग्ण? 

Corona Virus Update : २४ तासांत कोरोनाने घेतले ७ बळी, २७६ नव्या रुग्णांची भर! देशभरात किती सक्रिय रुग्ण? 

Corona Virus Update : कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २७६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. सध्या देशभरात ४३०२ रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकतीच बुधवार सकाळपर्यंतची आकडेवारी जारी केली. यासोबतच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आरोग्य अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मागच्या २४ तासांमध्ये २७६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, देशभरात आता कोरोना रुग्णांची संख्या ४३०२वर पोहोचली आहे. मात्र, ३२८१ रुग्ण कोरोनातून पूर्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोणत्या राज्यात किती रुग्ण?
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये ६० नवीन रुग्ण आढळले आहेत, तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनुक्रमे ६३ आणि ६४ रुग्ण आढळले आहेत. एक दिवस आधी, कोरोनाच्या ६५ नवीन रुग्णांसह, सक्रिय रुग्णांची संख्या ४,०२६ वर पोहोचली. याच कालावधीत, दिल्लीत ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि केरळमध्ये ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या, दिल्लीत ४५७, गुजरातमध्ये ४६१, कर्नाटकमध्ये ३२४, केरळमध्ये १३७३, महाराष्ट्रात ५१०, तामिळनाडूमध्ये २१६, उत्तर प्रदेशात २०१ आणि पश्चिम बंगालमध्ये ४३२ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Corona Virus Update: 7 Corona death in 24 hours, 276 new patients added! How many active patients are there in the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.