Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:12 PM2021-04-29T12:12:45+5:302021-04-29T12:13:46+5:30

या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि बरेच काही साहित्य आले आहे.

Corona Virus Russian flights with emergency humanitarian aid land in india | Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल

Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल

Next

नवी दिल्ली - भारतात कोरोना संकट वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. अशा कठीण काळात अनेक देश भारताला मदतीचा हात देत आहेत. यातच, जगभरात भारताचा जिगरी मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने भारताच्या मदतीसाठी दोन विमानं पाठवली आहेत.  ही दोन्ही विमानं दिल्ली एअरपोर्टवर उतरली आहेत. रशियाने या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर ऑषध पाठवले आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. (Corona Virus Russian flights with emergency humanitarian aid land in india)

CoronaVirus : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह, एक दिवस आधीच पत्नीही झालीय संक्रमित

यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात देशातील कोरोना स्थितीवर चर्चा झाली. यावेळी, आपण भारताला शक्यती सर्व प्रकारची मदत करू, असे आश्वासन पुतीन यांनी दिले. याशिवाय रशियाची स्पुतनिक-V लस मे महिन्यात भारतात पोहोचायला सुरुवात होईल. या लशीचे भारतातही उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. 

यावेळी रशियाच्या राजदूतांनीही गेल्या वर्षी भारताने केलेल्या मदतीचीही आठवण करून दिली. ते म्हणाले, गेल्या वर्षी महामारीच्या सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या मैत्रिचा परिचय देत रशियाला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा इमरजन्सी पुरवठा केला होता. आम्हाला ती मदत लक्षात आहे.

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

कठीण काळात एकमेकांची मदत करूनच आपण या महामारीचा पराभव करू शकतो. तसेच, आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला पाठविलेली मदत भारतासाठी लाभदायक ठरेल, अशी आम्हाला आशा आहे, असेही रशियाच्या राजदूतांनी म्हटले आहे.

Web Title: Corona Virus Russian flights with emergency humanitarian aid land in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.