CoronaVirus : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह, एक दिवस आधीच पत्नीही झालीय संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:20 AM2021-04-29T11:20:06+5:302021-04-29T11:21:51+5:30

यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्वीट करत माहिती दिली आहे. गेहलोत त्यांच्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरनाची लागण झाली आहे. यानंतर गेहलोत आयसोलेशनमध्ये गेले होते. 

CoronaVirus Rajasthan cm Ashok Gehlot tests positive for covid19 says he is asymptomatic | CoronaVirus : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह, एक दिवस आधीच पत्नीही झालीय संक्रमित

CoronaVirus : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह, एक दिवस आधीच पत्नीही झालीय संक्रमित

Next

जयपूर - संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुक्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा समावेश आहे. याच यादीत आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचेही नाव आले आहे. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (CoronaVirus Rajasthan cm Ashok Gehlot tests positive for covid19 says he is asymptomatic)

यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्वीट करत माहिती दिली आहे. गेहलोत त्यांच्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरनाची लागण झाली आहे. यानंतर गेहलोत आयसोलेशनमध्ये गेले होते. 

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

गेहलोत यांचं ट्विट -
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'कोरोना टेस्ट केल्यानंतर आज माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कुठल्याही प्रकारचे लक्षण नाहीत आणि मी ठीक आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत मी आयसोलेशनमध्ये राहूनच काम सुरू ठेवणार आहे.'

देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे.

परिस्थिती हाता बाहेर, हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा...; योगी सरकारला HC नं फटकारलं

देशात मृतांचा एकूण आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878  रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे. 
 

Web Title: CoronaVirus Rajasthan cm Ashok Gehlot tests positive for covid19 says he is asymptomatic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.