शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 4:27 PM

आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 10,632 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातही गेला आहे. कोरोना मृतांची संख्या 1,301 एवढी झाली आहे.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयानुसार, देशात आज सकाळपर्यंत 28,046 लोक कोरोनाबाधित होतेमहाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 12,296 रुग्ण आढळले आहेतदेशात केवळ 11 दिवसांत वाढले 20 हजार रुग्ण

नवी दिल्‍ली - कोरोना व्हायरसचा सामना करताना भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्यासाठी आता अधिक काळ लागत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे मरणारांचा दर जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेली 14 दिवस देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 10.5 एवढा होता. तो आज जवळपास 12 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आपला मृत्यूदर 3.2 टक्के एवढा आहे. हा मृत्यू दर जगात सर्वात कमी आहे. तसेच 10 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना डिस्‍चार्जदेखील देण्यात आला आहे.

आतापर्यंत 10,632 जण ठणठणीत -आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 10,632 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातही गेला आहे. कोरोना मृतांची संख्या 1,301 एवढी झाली आहे. तर कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता 39,980 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, आता 28,046 लोक कोरोनाबाधित आहेत.

महाराष्‍ट्रात सर्वाधिक मृत्यू -कोरोनामुळे आतापर्यंत 1,301 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एकट्या महाराष्ट्रातील 521, गुजरातमधील 262, मध्य प्रदेशातील 151, राजस्थानातील 65, दिल्लीतील 64, उत्तर प्रदेशातील 43, पश्चिम बंगाल तसेच आंध्र प्रदेशातील प्रत्येकी 33, तामिलनाडूतील 29, तेलंगाणातील 28 तर कर्नाटकातील 25 जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण -देशाचा विचार करता, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 12,296 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 2,000 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

11 दिवसांत 20 हजार रुग्ण -देशात 22 एप्रिलला कोरोनाचे 20,471 रुग्ण होते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 12 आठवडे लागले. यानंतर केवळ 11 दिवसांतच म्हणजे 3 मेला सकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 40 हजारांवर पोहोचली आहे. यादरम्यान केसेसचा डेली ग्रोथ रेट 5.2 ते 8.1 टक्क्यांदरम्यान होता. देशात 24 मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर 39,500 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतGujaratगुजरातdelhiदिल्ली