शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:37 IST

Corona Virus : जपानी बाबा वेंगा यांची कोरोनाच्या परत येण्याबद्दलची भविष्यवाणी ही २०२० च्या भाकिताशी अगदी जुळते.

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. याच दरम्यान सरकारने जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचे आणि अनेक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनामुळे जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये कोरोना परतल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशातच सोशल मीडिया आणि इंटरनेटवर पुन्हा एक नाव व्हायरल होत आहे, ते म्हणजे रियो तत्सुकी. लोक त्यांना जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखतात. १९९९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'द फ्युचर अ‍ॅज आय सी इट' या पुस्तकाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी पुस्तकात नमूद केलं की, २०२० मध्ये एक अज्ञात व्हायरस येईल, एप्रिलमध्ये शिखरावर पोहोचेल आणि नंतर १० वर्षांच्या आत पुन्हा परत येईल. तो अधिक प्राणघातक आणि विनाशकारी असेल.

२०२५ च्या मध्यापर्यंत जग कोरोना व्हायरससोबत जगायला शिकलं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये अचानक नव्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली. सध्या जरी परिस्थिती इतकी भयावह नसली तरी आरोग्य मंत्रालय आणि शास्त्रज्ञांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ पर्यंत, कोरोनाचे एकूण ७०.४ कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७० लाख लोकांचा मृत्यू झाला.

 "कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?

जपानी बाबा वेंगा यांची कोरोनाबद्दलची भविष्यवाणी

जपानी बाबा वेंगा यांची कोरोनाच्या परत येण्याबद्दलची भविष्यवाणी ही २०२० च्या भाकिताशी अगदी जुळते. भारत आणि जगात कोरोनाचा पहिला मोठा स्फोट २०२० मध्ये मार्च-एप्रिल दरम्यान झाला होता. या काळात कोरोना त्याच्या शिखरावर होता आणि नंतर कमी झाला. कोरोनाबद्दलच्या नवीन भविष्यवाणीमुळे चिंता वाढली आहे, त्यानुसार २०३० मध्ये कोरोना पुन्हा परत येईल आणि यावेळी व्हायरस जास्त लोकांना प्रभावित करेल. तसेच त्याच्याशी लढण्यासाठीची संसाधने देखील अपुरी पडतील असं म्हटलं आहे. 

कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

सरकार आणि आरोग्य संस्था व्हायरसची उत्पत्ती, नवनवीन व्हेरिएंट आणि लसीकरण यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मोठ्या संख्येने जनतेने जपानी बाबा वेंगा तत्सुकी यांची भविष्यवाणी गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. #2030CovidPrediction सारखे ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. YouTube, Reddit आणि X (पूर्वीचं ट्विटर) वर भविष्यवाणीचं विश्लेषण केलं जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत