शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 5:09 PM

गंभीर असलेल्या रुग्णांनाही आता हे औषध देता येईल. कंपनीने म्हटले आहे, की 'भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविफॉरची परवानगी गेम चेंजर ठरू शकते.

ठळक मुद्देहे औषध भारतात 'कोविफॉर' (Covifor) नावाने विकले जाईल. गंभीर असलेल्या रुग्णांनाही आता हे औषध देता येईल.कोविफॉर Covifor हे औषध 100mg इंजेक्शनमध्ये उपलब्ध होईल.

नवी दिल्‍ली : भारतात कोरोना व्हायरसच्या आणखी एका औषधाला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात हेटेरो (Hetero) या फार्मा कंपनीने रविवारी माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे, की आम्ही कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी इनव्हेस्टिगेशनल अॅन्टीव्हायरल ड्रग रेमडेसिवीर (Remdesivir) लॉन्‍च करत आहोत. यासाठी कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)ची परवानगीही मिळाली आहे. हे औषध भारतात 'कोविफॉर' (Covifor) नावाने विकले जाईल. 

यापूर्वी नुकतीच ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला कोरोनावरील उपचारांसाठी फेविपिरावीरचे (favipiravir)  जेनेरिक व्हर्जन लॉन्‍च करण्याची परवानगी मिळाली आहे. ग्लेनमार्कने फॅबिफ्लू (FabiFlu) नावाने हे औषध बाजारात आणले आहे.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

'गेम चेंजर ठरेल हे औषध' -कंपनीने दावा केला आहे, की डीजीसीआयने कोविड-19चे संभ्याव्य लोक तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. गंभीर असलेल्या रुग्णांनाही आता हे औषध देता येईल. कंपनीने म्हटले आहे, की 'भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविफॉरची परवानगी गेम चेंजर ठरू शकते. कारण या औषधाचे क्लिनिकल परिणाम पॉझिटिव्ह आले आहेत.' देशातील रुग्णांपर्यंत हे औषध लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा दावाही हेटेरोने केला आहे.

CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव

100mgच्या इंजेक्‍शनमध्ये येणार औषध -कोविफॉर Covifor हे औषध 100mg इंजेक्शनमध्ये उपलब्ध होईल. तसेच ते डॉक्‍टर अथवा आरोग्य कर्मचाऱ्याच्या देखरेखीखालीच घ्यावे लागेल. या औषधासाठी कंपनीने अमेरिकेच्या 'गिलियड सायन्सेस इंक'सोबत (Gilead Sciences Inc) करार केला आहे. हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीजचे चेयरमन म्हणाले, सध्याची गरज लक्षात घेता, आवश्यक स्‍टॉक देण्यासाठी कंपनी तयार आहे.

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

फेविपिरावीरही बाजारात -क्लिनिकल चाचणीत फॅबिफ्लूने कोरोना व्हायरसच्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे. कंपनी सरकार आणि आरोग्य समुदायासोबत एकत्रितपणे काम करणार आहे. त्यामुळे देशभरात रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध होऊ शकेल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १०३ रुपये प्रति टॅबलेट या किंमतीत बाजारात उपलब्ध होईल.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDrugsअमली पदार्थmedicineऔषधंMedicalवैद्यकीय