शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : देशात सर्वाधिक 'कोवीड-१९'चाचण्या महाराष्ट्रात; चार आठवड्यात तब्बल ६७ हजार तपासण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:51 IST

देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत राज्यात आठवड्याला होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या जास्त

ठळक मुद्दे राज्यात तब्बल २० शासकीय तपासणी केंद्र तर १९ खाजगी तपासणी केंद्रातून स्वॅब तपासणीमहाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थान, तामिळनाडू, केरळ आणि दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक तपासण्या

निनाद देशमुख- पुणे : देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत राज्यात आठवड्याला होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. यामुळेच राज्यात रूग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वाढता राहिला आहे. राज्यात तब्बल २० शासकीय तपासणी केंद्र तर १९ खाजगी तपासणी केंद्रातून स्वॅब तपासणी होत आहे. गेल्या आठवड्यात तब्बल २६ हजार ४३७ तपासण्या राज्यात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थान, तामिळनाडू, केरळ आणि दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत.देशात पहिला कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यावर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या साठी विमानतळावर तसेच शासनाच्या नामांकीत प्रयोगशाळेत संशयितांच्या तपासण्या करण्यास सुरूवात केली. सुरवातीला पुण्यातील एआयव्ही लॅब  या ठिकाणीच संशयीत्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येत होती. मात्र, संपूर्ण देशातच रूग्णांची संख्या वाढत असल्याने इतर राज्यातील केंद्राच्या तसेच राज्यांच्या तपासणी केंद्राबरोबरच खाजगी तपासणी केंद्रातही कोरोना संशयीतांची तपासणी करण्यास केंद्राने मान्यता दिली. यात लष्करी वैद्यकीय सेवेच्या प्रयोगशाळांचीही मदत घेण्यात आली.पहिला रूग्ण सापडल्यानंतर अनेक संशयितांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या. सुरवातीला पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा कमी होता. मात्र, संशयितांच्या टेस्ट होण्याची संख्या वाढल्या नंतर पॉझिटीव्ह रूग्णांची संख्याही वाढू लागली. २२ ते २८ मार्च दरम्यान राज्यात ५ हजार ४५४ संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्या खालोखात केरळ मध्ये या काळात ५ हजार २०१ टेस्ट करण्यात आल्या. तामिळनाडूमध्ये १ हजार ९४९, दिल्लीमध्ये १ हजार ४६३ आणि गुजरातमध्ये १ हजार १५७ संशयीतांच्या टेस्ट करण्यात आल्या. दरम्यानच्या काळात वाढलेल्या चाचणी केंद्रांच्या सुविधांमुळे १२ एप्रील ते १८ एप्रील दरम्यान राज्यात २६ हजार ४३७ संशयीतांच्या चाचण्या घेण्यात आल्या. राजस्थानमध्ये २७ हजार ९०४, गुजरात मध्ये २० हजार १०७, तामिळनाडूमध्ये १७ हजार ९९४, केरळमध्ये ६ हजार २४१, उत्तरप्रदेशात १५ हजार ४८ संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

देशात आतापर्यंत १५ हजार ७२२ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. त्यातील ५२० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक ३ हजार ६४८ रूग्ण पॉझिटिव्ह असून २११ जणांचा मृत्यू झाला आहे...................* देशभरात असलेले तपासणी केंद्र (शासकीय, खासगी मिळून) अंदमान आणि निकोबार १,  महाराष्ट्र ३९, राजस्थान ९, गुजरात  १४, तामीळनाडू २७, उत्तर प्रदेश १७,   केरळ  १२, दिल्ली  १८, आंध्रप्रदेश ७, कर्नाटक १७, हरियाना ११, मध्यप्रदेश १०, बिहार  ६, तेलंगणा  १९, पंजाब ५ , जम्मु काश्मिर  ४, उडीसा  ७, छत्तीसगड  ३, वेस्टबंगाल १३ , आसाम ६, झारखंड ३,  उत्तराखंड ३, हिमाचल प्रदेश ३, त्रिपुरा १, लद्दाख १, पाँडीचेरी १, चंदीगड ३, मेघालय १, दादरा नगर हवेली १, गोवा १, मणिपुर २, अरूणाचल प्रदेश १, नागालँड , मिझोरम १,   सिक्कीम १.   ..............* देशभरात आतापर्यंत झालेल्या संशयितांच्या चाचण्यामहाराष्ट्र ६६ हजार, राजस्थान ४२ हजार ७१८, गुजरात ३ हजार ७८३, तामीळनाडू २९ हजार १७८, उत्तर प्रदेश २६ हजार ९२०, केरळ २२ हजार २१५, दिल्ली २० हजार १४९, आंध्रप्रदेश १८ हजार ४३८, कर्नाटक १७ हजार १३२, हरियाना १३ हजार ८७२, मध्यप्रदेश १३ हजार ४६७, बिहार ११ हजार ३९०, तेलंगणा १० हजार ७ ५७, पंजाब ७ हजार २०, जम्मु काश्मिर ६ हजार ९८६, उडीसा ६ हजार ४२७, छत्तीसगड ५ हजार ९३०, वेस्टबंगाल ५ हजार ६२५, आसाम ४ हजार ४२२, झारखंड ३ हजार ५१०,  उत्तराखंड ३ हजार १३९, हिमाचल प्रदेश १ हजार ८८८, त्रिपुरा १ हजार ३१०, लद्दाख १ हजार २९६, पाँडीचेरी १ हजार २७५, चंदीगड ५९९, मेघालय ५६५, दादरा नगर हवेली ५४२, गोवा ५०२, मणिपुर ३७८, अरूणाचल प्रदेश ३७५, नागालँड ३५४, मिझोरम १२२, दमण दिव १७७, सिक्कीम ७७, लक्षद्विप ७.

.................देशांत ३ लाख ६८ हजार ६३६ तपासण्यादेशात १८ एप्रील पर्यंत ३ लाख ६८ हजार ६३६ तपासण्या करण्यात आल्या. या पैकी  १५ हजार ७२२ कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहे. या पैकी ५२० जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि १८) ३५ हजार ४९३ सँपल तपासण्यात आले. यातील २ हजार १५४ लोकांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरGovernmentसरकार